पोस्ट्स

digvijay jirage लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

इमेज
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या होऊन आज 34 वर्षे झाली. ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी मी शाळेत होतो. राजकारण आताही कळत नाही आणि तेव्हाही कळत नव्हतं. पण राजीव गांधींबद्दल जबरदस्त आकर्षण होतं. त्यामुळं त्यांची हत्या झाली कळल्यावर खूप हळहळ वाटली होती. नेमकं आत्ताच "राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?" हे फराझ अहमद लिखित आणि अवधूत डोंगरे अनुवादित मराठी पुस्तक वाचण्यात आलं. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २१ मे १९९१ रोजी झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर एक संशयास्पद आणि धक्कादायक दृष्टिकोन या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. राजीव गांधीबद्दल असं काही होऊ शकतं असा विचारही सर्वसामान्यांच्या मनात येणार नाही. परंतु, पुस्तकात जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावरून आपल्याही मनात शंका यायला सुरूवात होते. लेखकानं अधिकृत तपासण्या आणि अहवालांमध्ये नोंदवलेल्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या हत्येमागे केवळ एलटीटीईचाच हात नव्हता, तर भारतातील काही अंतर्गत शक्तींचाही सहभाग असू शकतो, असा दावा केला आहे. पुस्तकात लेखकाने विविध तपशील, पुरावे आणि घटनांची साखळी उलगडत, या हत्येच्य...

मिस न होणारं मिसिंग...

इमेज
पेपर उघडल्यानंतर पानभर जाहिराती पाहून आपण थोडं वैतागतो. परंतु, जाहिरातींच्या गर्दीत काही जाहिराती अशा असतात की तुमचं लक्ष जातंच आणि ती जाहिरात कितीही मोठी असली तरी आपण वाचतोच. आता ही जाहिरात पाहा... कदाचित क्वार्टर पेज जाहिरात असेल. भारीतला शेरवानी, त्यावर आभूषणं यामुळे आधीच हँडसम असलेला मुलगा या कपड्यांमध्ये एखाद्या राजकुमारापेक्षाही कमी दिसत नाही. पण या फोटोच्या वर मिसिंग असं शीर्षक आहे. त्यामुळे वाचकाचं लक्ष लगेच तिकडे जातं. हे असं कसं.... वाचकांच लक्ष आकर्षित करणारी सुलतानची जाहिरात मग्रूर सावकार आणि बनाना चिप्स...Beyond Snack जाहिरात लिहिलीय पण एकदम भारी. सुरुवातीला मुलाचं वर्णन दिलं आहे. केवळ त्याच्या दोन मागण्या मान्य न केल्यामुळे तो घरातून गायब झाला आहे. त्यामुळे घरच्यांनी तो मिसिंग असल्याची जाहिरात देऊन त्याच्या दोन्ही मागण्या म्हणजे त्याला ज्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे तिच्याशी लग्न लावून द्यायला आणि त्याच्या आवडीच्या सुलतान-द शेरवानी किंग मधून शेरवानी घ्यायला तयार असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर सुलतानची नवीन शाखा सुरु झाली असून तिथं पार्किंगची कोणतीच समस्या नसल्याचे म्...

ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा'- Brandnama

इमेज
हल्ली प्रत्येक क्षेत्रात ब्रँड आणि ब्रँडिंगला खूप महत्त्व आलं आहे...स्पर्धा तीव्र झाली आहे..एकाच वस्तूची अनेक उत्पादनं बाजारात आहेत..प्रत्येक जण आपलं उत्पादन वेगळं आणि चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय...प्रत्येकाला त्याच्या उत्पादन, सेवांचा खप वाढवायचा आहे...सगळेजण मार्केटिंग करत आहेत..पण ब्रँडिंगकडे खूप कमी जणांचं लक्ष आहे...स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही वरवरची प्रक्रिया नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करुन आपला ब्रँड निर्माण केला जातो. आज ग्राहकांचाही ब्रँडेड वस्तू घेण्याकडे कल असतो. अनेकांचे उत्पादन चांगले असते पण त्यांचा ब्रँड नसल्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ब्रँडचे महत्त्व हळूहळू लोकांना पटायला लागले आहे..आता राजकारणातही ब्रँड तयार होत आहेत.  ब्रँड म्हणजे काय, ब्रँडिंग कसं केलं जातं ? याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात..यासाठी काय करायचं असतं हेही माहीत नसतं. ब्रँडबाबतची इत्यंभूत माहिती सहज, सोप्या भाषेत अभिजित जोग यांनी आपल्या 'ब्रँडनामा' या पुस्तकात मांडली आहे. अभिजित जोग हे जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव. पुण्यात प्रतिसाद कम्युनिकेशनच्या माध्यमातून गेल्या ३०...

'अमूल' मॅन- The Amul Man

इमेज
'अमूल' मॅन भारतात 'अमूल' हे नाव माहीत नसलेला व्यक्ती विरळाच. प्रत्येकाच्या घरी आणि ओठी असणारा हा ब्रँड. जगात काहीही घडलं तर त्यावर भाष्य करणाऱ्या 'अमूल'च्या जाहिरातीकडं सर्वांचं लक्ष असतंच. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणं असो किंवा अमूलच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्याचं काम, अगदी इमानेइतबारे ज्यांनी केलं ते डॉ. वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांनी. 'माझंही एक स्वप्न होतं..' हे त्यांचं आत्मचरित्र. यात त्यांनी आपलं बालपण ते 'अमूल'च्या उभारणीपासून देशातील धवलक्रांती व त्यानंतरच्या घटनांचा उल्लेख केला आहे. गौरी साळवी यांनी 'आय टू हॅड अ ड्रीम' (I To Had A Dream) या नावानं इंग्रजीत हे पुस्तक लिहिलंय. तर सुजाता देशमुख यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे.  एक अभियंता अपघातानं दुग्ध उत्पादनात आला आणि सहकाराच्या माध्यमातून त्यानं देशात धवलक्रांती घडवली. या वाटचालीत आलेल्या अनुभवाचे कथन या आत्मचरित्रातून होतं. डॉ. कुरियन यांचं ग्रामीण भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. दुग्धोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यात त...

हे वाचल्‍यावर शेक्‍सपिअर म्‍हटला असता नावातच आहे सर्वकाही...

इमेज
नावात काय आहे, असे काही वर्षांपूर्वी शेक्‍सपियरने म्‍हटले होते. पण नावात काहीच नसंत असं खरंच असतं काय ? खरं तर नावांतच सर्व काही असतं. जगातील प्रत्‍येक आई-वडील आपल्‍या मुलाचं नाव काही तरी वेगळं, आकर्षक किंवा त्‍यातून गर्भित अर्थ निघेल असे ठेवत असतात. ही नावे ठेवण्‍यासाठी पालकांनाही मोठी कसरत करावी लागते. पूर्वीच्‍या काळी जगावेगळी नावं ठेवण्‍यासाठी पुस्‍तकं असायची. मग पालक बाजारातील अशी पुस्‍तकं शोधून काढत आणि आपल्‍या चिरंजीवांना किंवा सुपूत्रीला योग्‍य असं नाव (किमान त्‍यांना तरी वाटतं) ठेवत. आता तर एका क्लिकसरशी ही नावे कॉम्‍प्‍युटरच्‍या पडद्यावर अवघ्‍या काही सेकंदात मिळतात. काही मुलं आपल्‍या पालकांनी दिलेली नावे सार्थ ठरवतात तर काही आपल्‍या पाल्‍यांनाच तोंडावर पाडतात. एवढया कष्‍टाने नाव दिल्‍यानंतरही आपल्‍या मुलाला टोपण नाव (निक नेम) ठेवण्‍याचीही प्रथा दिसून येते (जसं एखाद्या विद्यापीठाने मानद डॉक्‍टरेट पदवी द्यावी). ही टोपण नावे कधी घरातून तर कधी मित्रपरिवाराकडून मिळतात. तर कधी-कधी त्‍यांच्‍या कर्तुत्‍वाने (कोणते कर्तुत्‍व हे ज्‍याच्‍या-त्‍याच्‍या कर्माने ठरत असते)...

सचिन नावाचा 'बाप' माणूस!

इमेज
सचिनने निवृत्ती घेतली आणि तमाम क्रिकेट चाहत्‍यांनी हळहळ व्‍यक्‍त केली. प्रत्‍येकाला जसा आश्‍चर्यचा धक्‍का बसला तसा तो मलाही बसला. सचिन निवृत्ती घेणार असल्‍याची चर्चा गेल्‍या काही दिवसांपासून माध्‍यमांमध्‍ये येत होती (तशी ती गेल्‍या अनेक वर्षांपासून होतीच, पण यावेळेसची बाब जरा वेगळीच). तरीसुद्धा त्‍याने निवृत्ती घेतल्‍यानंतर सगळं काही अनपेक्षितरित्‍या घडलं. त्‍यामुळे त्‍याच्‍या निवृत्तीचा निर्णय पचनीच पडत नाहीये. मागील काही दिवसांत सचिनची कामगिरी खालावली होती. ती पाहता सचिनने आता निवृत्ती घेतलीच पाहिजे, असे म्हणणारे जसे अनेक होते. तसेच त्‍याने निवृत्तीचा निर्णय आताच का घेतला, असे म्‍हणणारेही अनेकजण आहेत. सचिनने क्रिकेटच्‍या मैदानात किती विश्वविक्रम केले आणि सामनावीर पुरस्‍कार कितीवेळा मिळवले, हे आता सर्वांनाच माहिती आहे. त्‍यामुळे ते सांगण्‍याचे इथे काहीच प्रयोजन नाही. याची माहिती क्रिकेटरसिकांना वेगवेगळया माध्‍यमातून मिळत आली आहेच. सचिन तेंडुलकर नावाचे गारूड माझ्या पिढीच्या मनावर कधीपासून राज्‍य करायले लागले हे लक्षातच आले नाही. लहानपणी क्रिकेटचा 'क' कळण्‍याप...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'

इमेज
आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटपटू विजय झोल. टीम इंडियाला अंडर 19 चे विश्‍वविजेतेपद मिळवून देण्‍यात महत्‍वाची भूमिका निभाणा-या विजयची घेतलेली मुलाखत...   'विजय झोल' गेल्‍या एक-दोन वर्षांपासून क्रिकेटच्‍या क्षितिजावर सतत झळकणारे हे नाव. मराठवाड्यातील जालना सारख्‍या एका छोटयाशा शहरातून क्रिकेटसाठी कोणत्‍याही प्रकारचे पोषक वातावरण नसतानाही फक्‍त गुणवत्तेच्‍या जोरावर पुढे आलेला हा खेळाडू. मैदानात फलंदाजीस गेल्‍यानंतर खंडीभर धावा केल्‍याशिवाय परत न येणारा खेळाडू अशी त्‍याची क्रिकेटच्‍या दुनियेतली ओळख. 'सातत्‍य' म्‍हणजे विजय झोल हे आता समीकरणच बनले आहे. आपल्‍या फलंदाजीतील सातत्‍यामुळे प्रत्‍येकाच्‍या ओठावर त्‍याचे नाव आहे. आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वडील हरी झोल हेच आपले आयकॉन असल्‍याचे सांगणारा विजय आपल्‍या खेळाचे सर्व श्रेय जालन्‍याचे प्रशिक्षक राजू काणे यांना देतो. विजय पहिल्‍यांदा प्रकाशझोतात आला कुचबिहार करंडकातील 451 धावांच्‍या नाबाद विक्रमी खेळीमुळे. आपल्‍या डावखु-या फलंदाजीने भल्‍या-भल्‍या गोलंदाजांच्‍या तोंडचे पाणी पळवणा-या विजयने ऑस्‍ट्रेलियातील 19 व...

... आणि बाळासाहेबांना पुन्‍हा भेटण्‍याची इच्‍छा अपुरीच राहिली

इमेज
महाराष्‍ट्राची आंतरराष्‍ट्रीय कबड्डीपट्टू सुवर्णा बारटक्‍के हिची घेतलेली मुलाखत...  कबड्डी खेळात महाराष्‍ट्राची विशाल अशी परंपरा आहे. चपळ हालचाल, श्‍वास रोखून धरण्‍याची क्षमता, समयसूचकता, सांघिक कौशल्‍य आणि यासर्वांसाठी लागणारी शाररिक क्षमता महाराष्‍ट्राच्‍या खेळाडूंमध्‍ये ठासून भरलेली दिसते. या खेळात महाराष्‍ट्राच्‍या मातीने अनेक मोहरे देशाला दिले. पुरूषांबरोबरच महिला खेळाडूंनीही ही गौरवशाली परंपरा कायम ठेवली. त्‍यातीलच एक नाव सुवर्णा बारटक्‍के (Suvarna Bartakke). कबड्डी हाच श्‍वास असलेल्‍या सुवर्णाने मार्च महिन्‍यात झालेल्‍या पहिल्‍या महिला कबड्डी विश्‍वचषकाचे भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्‍यात महत्‍वाची भूमिका निभावली. तिच्‍या या यशाबद्दल जाणून घेण्‍यासाठी जेव्‍हा सुवर्णाला फोन केला तेव्‍हा बोलता बोलता आपसुकच बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) विषयही निघाला. मग गत आठवणींना उजाळा देताना भावुक झालेल्‍या सुवर्णाने भविष्‍यात चांगली कामगिरी केल्‍यानंतर बाळासाहेबांचे आर्शिवाद घेता येणार नाही, अशी खंत व्‍यक्‍त केली. भाऊ कबड्डीपटू त्‍यामुळे या ...

आमचा विसरभोळा भाई !

इमेज
शीर्षक वाचून तुम्‍हाला मी महाराष्‍ट्रातील लाडके व्‍यक्‍तीमत्‍व पुलं विषयी बोलत असेल असं वाटेल. पण तसं नाही (कानाला हात लावून) मी ज्‍या भाईविषयी सांगणार आहे तोही काही असा-तसा नाही. तोही तोडीस तोड आहे (म्‍हणजे गुंड वगैरे नाही, गैरसमज नको). हे भाई कसे आहेत हे तुम्‍हाला पुढं लक्षात येईलच. आमचा भाई म्‍हणजे उन्‍मेष खंडाळे.  उन्‍मेष हे त्‍याचे नाव आहे. सुरूवातीला भाई कसा लागला मला माहीत नाही. पण सगळे पूर्वीपासूनच त्‍याला भाई म्‍हणतात. मला अनेकवेळा उत्‍सुकता होती भाई नावाचा इतिहास जाणून घेण्‍याची पण विचारायचे राहूनच गेले (कदाचित आता माहित होईल, असे गृहीत धरतो). उन्‍मेषला 'भाई' ही उपाधी खूप प्रिय आहे. याची प्रचिती तुम्‍ही त्‍याला फोन लावल्‍यानंतर लक्षात येईल. रेकॉर्डरूपी बाई समोरून सारखं भाई उन्‍मेषला फोन लावल्‍याबद्दल आपले आभार मानीत असते.  त्‍याशिवाय त्‍याचं फेसबुक प्रोफाईलही 'भाई' या नावानेच सुरू होते.(यावरून तुम्‍हाला पुसटशी कल्‍पना येईल). भाईविषयी अधिक सांगायचं म्‍हटलं तर तो आणि मी समवयीनच आहोत. पण तो गेल्‍या पाच-साडेपाच वर्षांपासून पत्रकारितेत आहे. सुरूवातीला प्रिंट मीड...