पोस्ट्स

Effective Advertising लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भावनेला अलगद स्पर्श करणारी जाहिरात - Brooke Bond Red Label

इमेज
काही प्रॉडक्टच्या जाहिराती नेहमी मनाला स्पर्श करणाऱ्या असतात. ब्रुक बाँड रेड लेबल (Brooke Bond Red Label) हे उत्पादन त्यापैकी एक. सध्याची त्यांची नवी जाहिरात ही भावनेला हात घालणारी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे यात काम केलेल्या सुलभा आर्य यांच्या अभिनयामुळे ही जाहिरात एका वेगळ्याच उंचीवर जाते. (Creative and Emotional Advertisement of Brooke Bond Red Label) तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट... सुलभा आर्य यांचा निरागस अभिनय (Sulbha Arya's Best Acting) घरासमोर असलेल्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनोळखी लोकांना म्हणजे रुग्णासोबत आलेल्यांना सुलभा आर्य या चहा देताना यात दाखवण्यात आले आहे. तणावात असलेल्या लोकांना घोटभर चहा देऊन त्याचबरोबर त्याची आपलेपणाने चौकशी करुन त्यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न त्या करत असतात. सुरुवातीला चहा नको म्हणणारी व्यक्ती नंतर चहाचा सुवास येताच मागून चहा पितो आणि गप्पांच्या ओघात तो आपला तणाव काही वेळासाठी विसरुन जातो, असं यात दाखवण्यात आलं आहे.  सुलभा आर्य यांच्या निरागस अभिनयामुळे ही जाहिरात वेगळ्या उंचीवर जाते. त्या गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहेत....

तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट...

इमेज
ज्यांच्या घरी लहान मुलं असतात तिथं हमखास चालणारा हा संवाद. ते छोटं मूल रोजचे शब्द चुकीचं उच्चारत असतं. त्यांना ती, तो, ते (gender of things) याच्यातील फरक समजत नसतो... ते हमखास 'तो' असेल तर 'ती' चा शब्दप्रयोग करतात किंवा 'ती' असेल तर 'तो' असं म्हणतात. मुलांनी असा चुकीचा उच्चार केला की आई-वडील-आजी-आजोबा लगेच त्यांना तो उच्चार कसा चुकीचा आहे, हे सांगतात. आमच्या घरीही असे प्रकार होतात. माझा मुलगा विराज पूर्वी असा घोळ घालायचा आता छोटी शताक्षी असं करते.  हेही वाचा-   अभिनेत्री ते यशस्वी स्टार्टअपचा प्रवास अगदी हेच ल्युमिनियस या इन्व्हर्टर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत दिसून येतं. महिला दिनाच्या निमित्ताने ग्रे ग्रूपने ही जाहिरात तयार केली आहे. जाहिरात बरोबर लाईटशी कनेक्ट केली आहे. ही जाहिरात बेस्टच झाली आहे. प्रत्येकाला आपल्या घरात असे घडलेले किस्से लगेच समोर येतील.  जाहिरातीची ही कल्पना मोठ्या ब्रँडला पटवून विकणे हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर ल्युमिनिअसनेही अशी जाहिरात करुन एक धाडसी पाऊल उचललं आहे. हेही वाचा-  जगातील सर्वात मोठं स्कल्पचर केरळमधील...