भावनेला अलगद स्पर्श करणारी जाहिरात - Brooke Bond Red Label



Brooke Bond Red Label (Courtesy- You Tube )


काही प्रॉडक्टच्या जाहिराती नेहमी मनाला स्पर्श करणाऱ्या असतात. ब्रुक बाँड रेड लेबल (Brooke Bond Red Label) हे उत्पादन त्यापैकी एक. सध्याची त्यांची नवी जाहिरात ही भावनेला हात घालणारी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे यात काम केलेल्या सुलभा आर्य यांच्या अभिनयामुळे ही जाहिरात एका वेगळ्याच उंचीवर जाते. (Creative and Emotional Advertisement of Brooke Bond Red Label)

तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट...

सुलभा आर्य यांचा निरागस अभिनय (Sulbha Arya's Best Acting)

घरासमोर असलेल्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनोळखी लोकांना म्हणजे रुग्णासोबत आलेल्यांना सुलभा आर्य या चहा देताना यात दाखवण्यात आले आहे. तणावात असलेल्या लोकांना घोटभर चहा देऊन त्याचबरोबर त्याची आपलेपणाने चौकशी करुन त्यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न त्या करत असतात. सुरुवातीला चहा नको म्हणणारी व्यक्ती नंतर चहाचा सुवास येताच मागून चहा पितो आणि गप्पांच्या ओघात तो आपला तणाव काही वेळासाठी विसरुन जातो, असं यात दाखवण्यात आलं आहे. 



सुलभा आर्य यांच्या निरागस अभिनयामुळे ही जाहिरात वेगळ्या उंचीवर जाते. त्या गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहेत. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळापासून त्या छोट्या पडद्यावर दिसतात. त्यामुळे त्यांच्या अभिनय सर्वांना माहीत आहेच. या जाहिरातीतही त्यांनी कमाल केली आहे. 

पुन्हा 'कॅम्पा कोला' म्हणजेच 'The Great Indian Taste'

ब्रुक बाँडच्या यापूर्वीच्याही जाहिराती दखल घेण्यासारख्या आहेत. ग्राहकांच्या भावनेला हात घालणाऱ्या त्यांच्या जाहिराती असतात. 


जाहिरात एजन्सी- Ogilvy


- डॉ. दिग्विजय जिरगे

#जाहिरात #advertisement #creative

टिप्पण्या

  1. बेस्ट आज काल जाणीव असणं आणि त्याची आठवणं करून देण ही महत्वाचे आहॆ thx

    उत्तर द्याहटवा
  2. विश्लेषण आणि जाहिरात पाहण्याचा दृष्टिकोन विलक्षण आहे डॉक्टर...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'