पुन्हा 'कॅम्पा कोला' म्हणजेच 'The Great Indian Taste'




थम्स अप, कोका कोला, पेप्सी आणि इतर कोल्ड ड्रिंकला टक्कर देण्यासाठी अंबानींनी म्हणजेच रिलायन्सने (Reliance) 'कॅम्पा कोला' (Campa Cola) रिलाँच केलं आहे (कॅम्पा ब्रँड हा तसा जुना आहे. रिलायन्सने तो खरेदी केला आहे.). त्यामुळे आता कोल्ड ड्रिंक कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा 'कोल्ड वॉर' सुरु होणार असं दिसतंय. रिलायन्स सध्या ज्या बिझनेसमध्ये उतरतंय (जियो वगैरे) ते पाहता या क्षेत्रातही आता 'कर लो दुनिया मुठ्ठी मैं' असंच होण्याची शक्यता आहे. 


रिलायन्ससारखा ब्रँड कॅम्पा कोला घेऊन येतंय म्हटल्यावर आता या मार्केटमधील दिग्गज कंपन्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलली असणार. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत आता आपल्याला क्वॉलिटी, क्वाँटिटी, प्राइस त्याचबरोबर जाहिरात जगतात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कॅम्पा कोलाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण असणार याची उत्सुकता आता आहे आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडरसाठी रिलायन्स पैसा गुंतवायला मागे पुढे पाहणार नाही हे मात्र खरं आहे. जाहिरातीच्या दृष्टीने 'कॅम्पा कोला'वर थोडीशी नजर टाकूयात.


कॅम्पा ब्रँड नावाचा फायदा घेण्यासाठी रिलायन्स जाहिरात करताना त्यांच्या तीन व्हेरियंटची (कोला, ऑरेंज आणि लाइम) एकत्रित जाहिरात करेल की, कोलासाठी म्हणजे स्पर्धक कंपनी पेप्सी/कोका-कोला/थम्स अप, ऑरेंज स्पर्धक मिरिंडा/फँटा आणि लाइम स्पर्ध कंपनी 7अप/लिमका/ स्प्राइट या प्रत्येक स्पर्धकांसाठी वेगवेगळे कॅम्पेन राबवेल याची एक उत्सुकता लागून राहिली आहे. 


सध्या कोका-कोलाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर हा टायगर श्रॉफ आहे.

थम्स अप- शाहरुख खान (Shah Rukh Khan)

पेप्सी- रणवीर सिंग (Ranveer Singh)

7 अप- रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)

लिमका- नीरज चोप्रा (Neeraj Chopra)

फँटा- कार्तिक आर्यन, सारा अली खान आहे. (Kartik Aaryan & Sara Ali Khan)

याबाबत रिलायन्सचा विचार केला असता ते कोणाबरोबरही करार करु शकतात. कारण त्यांना कोणताही स्टार परवडेल. 


1983 मध्ये कैलाश सुरेंद्रनाथ (Kailash Surendranath) यांनी कॅम्पा कोलाची एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत सलमान खान होता. त्यावेळी कदाचित तो 16 किंवा 17 वर्षांचा असेल (या पोस्टमध्ये या जाहिरातीचा व्हिडिओ जोडला आहे. त्यात सलमान कसा दिसतो हेही पाहा.). त्याची ती पहिली जाहिरात असल्याचे म्हटलं जातं. विशेष म्हणजे सलमान सध्या कोल्ड ड्रिंकच्या कोणत्याच ब्रँडशी अटॅच नाही. त्याचा शेवटचा कोल्ड ड्रिंक ब्रँड हा पेप्सी होता. अलीकडेच रणवीरने त्याची जागा घेतली आहे.



कॅम्पाची पोझिशिनिंग काय असेल? पूर्वीसारखे 'द ग्रेट इंडियन टेस्ट' (The Great Indian Taste), की एखादं नवीन?


महत्त्वाचं म्हणजे कोणत्या अ‍ॅड एजन्सीकडे याचं काम जाईल. ज्यांच्याशी करार होईल त्याचा आकडा मात्र मोठा असणार. 


#advertising #जाहिरात #CampaCola #Reliance #Thumsup #CocaCola #Pepsi #Fanta #7Up 

- डॉ. दिग्विजय जिरगे



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'