महापालिका रणांगण: नवे कारभारी निवडताना पुणेकरांचाच लागणार कस!
तुमचे मत पुणे महापालिकेत कोणता पक्ष सत्तेवर येईल, असे वाटते? कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप-शिवसेना-रिपब्लिकन पक्ष महायुती महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्याची जनता 'सवाई' आहे, असे म्हटले जाते. परंतु, त्यांनीच निवडून दिलेले सत्ताधारी त्यांच्यापेक्षाही 'सवाई' निघालेत. गेल्या पाच वर्षांत विकासाच्या नावाखाली सामान्यांना झुलवत ठेऊन अनोखा 'पुणे पॅटर्न' राबवून जनतेलाच वेठीस धरणा-या राजकीय पक्षांनी आता 16 फेब्रुवारीसाठी नव्याने रणशिंग फुंकलंय. विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष नसलेली पुणे महानगरपालिका कदाचित देशातील एकमेव महानगरपालिका असेल, कारण गेल्या पाच वर्षात येथे जवळपास प्रत्येक पक्षाने सत्तेची ऊब घेतलीये. पुणे शहर खरचं देशातील एक 'अनोखं' शहर ठरू पाहातयं. शहरातील राजकीय परिस्थिती पाहिल्यास याचं 'अनोखं'पण आपल्या लक्षात येईल. खासदार भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात त्यामुळे संसदेत शहराचे नेतृत्वच नाही तर राष्ट्रवादीच्या हातात महानगरपालिका असूनही अंतर्गत ग...