पोस्ट्स

campa cola relaunch लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पुन्हा 'कॅम्पा कोला' म्हणजेच 'The Great Indian Taste'

इमेज
थम्स अप, कोका कोला, पेप्सी आणि इतर कोल्ड ड्रिंकला टक्कर देण्यासाठी अंबानींनी म्हणजेच रिलायन्सने (Reliance) 'कॅम्पा कोला' (Campa Cola) रिलाँच केलं आहे (कॅम्पा ब्रँड हा तसा जुना आहे. रिलायन्सने तो खरेदी केला आहे.). त्यामुळे आता कोल्ड ड्रिंक कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा 'कोल्ड वॉर' सुरु होणार असं दिसतंय. रिलायन्स सध्या ज्या बिझनेसमध्ये उतरतंय (जियो वगैरे) ते पाहता या क्षेत्रातही आता 'कर लो दुनिया मुठ्ठी मैं' असंच होण्याची शक्यता आहे.  रिलायन्ससारखा ब्रँड कॅम्पा कोला घेऊन येतंय म्हटल्यावर आता या मार्केटमधील दिग्गज कंपन्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलली असणार. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत आता आपल्याला क्वॉलिटी, क्वाँटिटी, प्राइस त्याचबरोबर जाहिरात जगतात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कॅम्पा कोलाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण असणार याची उत्सुकता आता आहे आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडरसाठी रिलायन्स पैसा गुंतवायला मागे पुढे पाहणार नाही हे मात्र खरं आहे. जाहिरातीच्या दृष्टीने 'कॅम्पा कोला'वर थोडीशी नजर टाकूयात. कॅम्पा ब्रँड नावाचा फायदा घेण्यासाठी रिलायन्स जाहिरात करताना त्यांच्...