'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय झोल. टीम इंडियाला अंडर 19 चे विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभाणा-या विजयची घेतलेली मुलाखत... 'विजय झोल' गेल्या एक-दोन वर्षांपासून क्रिकेटच्या क्षितिजावर सतत झळकणारे हे नाव. मराठवाड्यातील जालना सारख्या एका छोटयाशा शहरातून क्रिकेटसाठी कोणत्याही प्रकारचे पोषक वातावरण नसतानाही फक्त गुणवत्तेच्या जोरावर पुढे आलेला हा खेळाडू. मैदानात फलंदाजीस गेल्यानंतर खंडीभर धावा केल्याशिवाय परत न येणारा खेळाडू अशी त्याची क्रिकेटच्या दुनियेतली ओळख. 'सातत्य' म्हणजे विजय झोल हे आता समीकरणच बनले आहे. आपल्या फलंदाजीतील सातत्यामुळे प्रत्येकाच्या ओठावर त्याचे नाव आहे. आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वडील हरी झोल हेच आपले आयकॉन असल्याचे सांगणारा विजय आपल्या खेळाचे सर्व श्रेय जालन्याचे प्रशिक्षक राजू काणे यांना देतो. विजय पहिल्यांदा प्रकाशझोतात आला कुचबिहार करंडकातील 451 धावांच्या नाबाद विक्रमी खेळीमुळे. आपल्या डावखु-या फलंदाजीने भल्या-भल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणा-या विजयने ऑस्ट्रेलियातील 19 व...