मेरा बाप संत था...मैं नही हूं!
- दिग्विजय जिरगे चंद्रभानु गुप्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचा कल सिंडिकेट ग्रूपकडे झुकला होता म्हणजे त्यांनी सिंडिकेटला जवळ करण्यास सुरुवात केली होती. तर चंद्रभानु गुप्ता यांचे निकटवर्तीय बनारसीदास गुप्ता हे इंदिरा गांधी यांना भेटायला गेले होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना बसण्यासही सांगितलं नाही. बनारसीदास यांच्याकडे न पाहता फाईलीत डोकं घालून बसलेल्या इंदिरा गांधी या मान वरही न करता त्यांना म्हणाल्या, मेरा बाप संत था...मैं नही हूं! हा किस्सा सांगितलाय ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी... भारतात रियल पॉलिटिक्सची सुरुवात इंदिरा गांधी यांनी केली. राजकारणाला आर्ट-सायन्समध्ये परावर्तीत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना पॉवरचं कॅरेक्टर चांगलं समजलं होतं. साम-दाम-दंड-भेदाच्या राजकारणाच्या त्या मास्टर होत्या, असे नीरजा चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी 'How Prime Ministers Decide' हे पुस्तक लिहिलं आहे. आपल्या पुस्तकात त्यांनी 6 पंतप्रधानांवर लिहिलं आहे. 600 पानांचं हे जाडजुड असं हे पुस्तक आहे. भारतीय राजकारणातील अनेक घटना, घडामोडींच्या त्या 'आय विटनेस' आहे...