'अमूल' मॅन- The Amul Man
'अमूल' मॅन भारतात 'अमूल' हे नाव माहीत नसलेला व्यक्ती विरळाच. प्रत्येकाच्या घरी आणि ओठी असणारा हा ब्रँड. जगात काहीही घडलं तर त्यावर भाष्य करणाऱ्या 'अमूल'च्या जाहिरातीकडं सर्वांचं लक्ष असतंच. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणं असो किंवा अमूलच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्याचं काम, अगदी इमानेइतबारे ज्यांनी केलं ते डॉ. वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांनी. 'माझंही एक स्वप्न होतं..' हे त्यांचं आत्मचरित्र. यात त्यांनी आपलं बालपण ते 'अमूल'च्या उभारणीपासून देशातील धवलक्रांती व त्यानंतरच्या घटनांचा उल्लेख केला आहे. गौरी साळवी यांनी 'आय टू हॅड अ ड्रीम' (I To Had A Dream) या नावानं इंग्रजीत हे पुस्तक लिहिलंय. तर सुजाता देशमुख यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे. एक अभियंता अपघातानं दुग्ध उत्पादनात आला आणि सहकाराच्या माध्यमातून त्यानं देशात धवलक्रांती घडवली. या वाटचालीत आलेल्या अनुभवाचे कथन या आत्मचरित्रातून होतं. डॉ. कुरियन यांचं ग्रामीण भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. दुग्धोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यात त...