अभिनेत्री ते यशस्वी स्टार्टअपचा प्रवास
तिरुपती बालाजी मंदिर येथून ही केस (Hair) खरेदी करते आणि स्वतःच्या वेबसाईटवर ते विकून महिन्याला लाखो रुपये कमावते.
पारुल गुलाटी तिचे नाव असून 'निश हेअर'ची ती संस्थापिका आहे. पारुल एक अभिनेत्री, कंटेट क्रिएटर आणि उद्योजिका आहे. नुकताच ती शार्क टँक इंडियामध्ये आली होती. पारुलने काही सिनेमे, वेब सिरिज आणि मालिकांमधून काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर ती भरपूर चर्चेत आहे.
भारतातील लाखो, कोट्यवधी महिला केस गळतीसह केसांच्या इतर समस्येला सामोरे जातात. अनेकजण यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. फॅशन आणि ब्यूटी इंडस्ट्रीच्या पलीकडचा विचार पारुलने केला. देशात चांगल्या दर्जाच्या मानवी केसांच्या व्यवसायाची वाट तिने धरली.
त्यातूनच तिने २०१७ मध्ये भारतातील पहिले ऑनलाइन हेअर एक्स्टेंशन सुरु केले. पहिले दोन वर्षे तिने विविध ठिकाणी स्टॉल्स लावून डेमो दाखवले, लोकांना हेअर एक्स्टेंशनबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिलाही कोविडचा फटका बसला. कोरोना महामारीमुळे फिजिकली डेमो दाखवणे बंद झाले.
तेव्हाच तिने पर्सनल ब्रँडिंगच्या पॉवरचा फायदा घेतला. मग तिने इन्स्टाग्रामवर रिल्स पोस्ट करणे सुरु केले. दोन वर्षांच्या आत, तिच्या वैयक्तिक पेजचे 1 Mn+ फॉलोअर्स झाले. विग वापरणे वाईट नाही, याचा तिने लोकांना विश्वास दिला.
- डॉ. दिग्विजय जिरगे
#ParulGulati #NishHair #Branding #StartUp

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा