तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट...


ज्यांच्या घरी लहान मुलं असतात तिथं हमखास चालणारा हा संवाद. ते छोटं मूल रोजचे शब्द चुकीचं उच्चारत असतं. त्यांना ती, तो, ते (gender of things) याच्यातील फरक समजत नसतो... ते हमखास 'तो' असेल तर 'ती' चा शब्दप्रयोग करतात किंवा 'ती' असेल तर 'तो' असं म्हणतात. मुलांनी असा चुकीचा उच्चार केला की आई-वडील-आजी-आजोबा लगेच त्यांना तो उच्चार कसा चुकीचा आहे, हे सांगतात. आमच्या घरीही असे प्रकार होतात. माझा मुलगा विराज पूर्वी असा घोळ घालायचा आता छोटी शताक्षी असं करते. 



हेही वाचा- अभिनेत्री ते यशस्वी स्टार्टअपचा प्रवास

अगदी हेच ल्युमिनियस या इन्व्हर्टर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत दिसून येतं. महिला दिनाच्या निमित्ताने ग्रे ग्रूपने ही जाहिरात तयार केली आहे. जाहिरात बरोबर लाईटशी कनेक्ट केली आहे. ही जाहिरात बेस्टच झाली आहे. प्रत्येकाला आपल्या घरात असे घडलेले किस्से लगेच समोर येतील. 



जाहिरातीची ही कल्पना मोठ्या ब्रँडला पटवून विकणे हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर ल्युमिनिअसनेही अशी जाहिरात करुन एक धाडसी पाऊल उचललं आहे.

हेही वाचा- जगातील सर्वात मोठं स्कल्पचर केरळमधील 'जटायू अर्थ सेंटर'

- डॉ. दिग्विजय जिरगे


#advertising #marketing #जाहिरात #creative #creativity


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'