जगातील सर्वात मोठं स्कल्पचर केरळमधील 'जटायू अर्थ सेंटर'



केरळमधील कोल्लम शहरापासून अगदी जवळ जटायू अर्थ सेंटर (Jatayu Earth’s Center) इथं जटायूचं अत्यंत सुंदर आणि मोठं स्कल्पचर (Jatayu Rock) आहे. जगातील हे सर्वात मोठं स्कल्पचर असल्याचं सांगितलं जातं.

पौराणिक कथेनुसार, ज्यावेळी रावण सीतेचं अपहरण करून नेत होता, त्यावेळी रावणाशी लढताना जटायू पक्षी खाली पडला होता. त्याच ठिकाणी हे स्कल्पचर आहे. हे स्कल्पचर ही अर्ध्या पंखाचं आहे.

डोंगरावर हे स्कल्पचर उभारण्यात आलं आहे. हे स्कल्पचर 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 70 फूट उंच आहे.
प्रख्यात मल्याळम फिल्ममेकर राजीव आंचल यांनी 15000 स्क्वेअर फूट प्लॅटफॉर्मवर हे उभारलं आहे. सुमारे 896 पायऱ्या चढून वर जावं लागतं. वर 6 D थिएटर, डिजिटल म्युझियम आहे, पण सध्या कोरोना मुळं हे बंद आहे. बाजूला प्रभू श्रीरामाचे रेखीव मंदिर आहे.



वर जाण्यासाठी रोप वे ही आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, गेम झोन, आयुर्वेदिक रिसॉर्ट ही आहे.

सर्वांनी पाहावं असं हे ठिकाण आहे...वर जाताना प्रत्येकाच्या फिटनेसचा कस लागतो, हे मात्र नक्की..

जवळचं विमानतळः त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सुमारे 52 किमी आहे.
जवळचं रेल्वे स्टेशनः कोल्लम जंक्शन, सुमारे 35 किमी आणि तिरुअनंतपूरम सेंट्रल सुमारे 55 किमी


- Digvijay Jirage/ दिग्विजय जिरगे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'