मग्रूर सावकार आणि बनाना चिप्स...Beyond Snack

सोनं दाताखाली चावून त्याची शुद्धता किंवा अस्सलपणा ओळखण्याची जुनी पद्धत केळीच्या चिप्ससाठी (ज्याचा रंग सोन्याप्रमाणे पिवळा असतो) वापरण्याची जबरदस्त कल्पना या जाहिरातीत वापरण्यात आली आहे.

Beyond Snack Creative & Funny Advertisement


ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा'

या जाहिरातीसाठीचे कलाकार आणि सेटअपही भारी आहेत. गावातील मग्रूर सावकार लोकांकडून सोनं घेऊन पैसे देत असतो. यासाठी त्यानं एक छोटसं मशीन आपल्या जवळ ठेवलं आहे. सोनं चावून त्याप्रमाणे तो लोकांना त्या मशीनमधून पैसे देतोय. त्याचवेळी एकजण खोटं सोनं देतो. ते सोनं सावकारानं दाताखाली घेताच त्याचे तुकडे होतात. सावकाराची लोकं लगेच त्या माणसाला उचलून नेतात. यावेळी वापरलेलं बॅकग्राऊंड म्युझिक प्रसंगाला अनुरुप आहे.


बियाँड स्नॅक्सचे केळीचे चिप्सही सोन्यासारखे अस्सल असल्याचे अत्यंत स्मार्ट पद्धतीनं या जाहिरातीत दाखवलं आहे. प्रेझंटेशन चांगलं झालं आहे.
जाहिरात एजन्सी- Sterling AG

- डॉ. दिग्विजय जिरगे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'