मिस न होणारं मिसिंग...
पेपर उघडल्यानंतर पानभर जाहिराती पाहून आपण थोडं वैतागतो. परंतु, जाहिरातींच्या गर्दीत काही जाहिराती अशा असतात की तुमचं लक्ष जातंच आणि ती जाहिरात कितीही मोठी असली तरी आपण वाचतोच.
आता ही जाहिरात पाहा... कदाचित क्वार्टर पेज जाहिरात असेल. भारीतला शेरवानी, त्यावर आभूषणं यामुळे आधीच हँडसम असलेला मुलगा या कपड्यांमध्ये एखाद्या राजकुमारापेक्षाही कमी दिसत नाही. पण या फोटोच्या वर मिसिंग असं शीर्षक आहे. त्यामुळे वाचकाचं लक्ष लगेच तिकडे जातं. हे असं कसं....
![]() |
| वाचकांच लक्ष आकर्षित करणारी सुलतानची जाहिरात |
जाहिरात लिहिलीय पण एकदम भारी. सुरुवातीला मुलाचं वर्णन दिलं आहे. केवळ त्याच्या दोन मागण्या मान्य न केल्यामुळे तो घरातून गायब झाला आहे. त्यामुळे घरच्यांनी तो मिसिंग असल्याची जाहिरात देऊन त्याच्या दोन्ही मागण्या म्हणजे त्याला ज्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे तिच्याशी लग्न लावून द्यायला आणि त्याच्या आवडीच्या सुलतान-द शेरवानी किंग मधून शेरवानी घ्यायला तयार असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर सुलतानची नवीन शाखा सुरु झाली असून तिथं पार्किंगची कोणतीच समस्या नसल्याचे म्हटलं आहे.
या जाहिरातीत या मॉडेलशिवाय दुसरा कुठलाच फोटो नाही... ना दुकानाचा ना इतर गोष्टीचा...
ही जाहिरात एकदम हटके आणि लक्ष वेधणारी ठरली आहे. याची मांडणी, याची शब्दरचना सगळंच वेगळं आहे. इंटरनेटवर सध्या चर्चेत असलेली ही जाहिरात आहे.
- डॉ. दिग्विजय जिरगे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा