हे वाचल्‍यावर शेक्‍सपिअर म्‍हटला असता नावातच आहे सर्वकाही...

नावात काय आहे, असे काही वर्षांपूर्वी शेक्‍सपियरने म्‍हटले होते. पण नावात काहीच नसंत असं खरंच असतं काय ? खरं तर नावांतच सर्व काही असतं. जगातील प्रत्‍येक आई-वडील आपल्‍या मुलाचं नाव काही तरी वेगळं, आकर्षक किंवा त्‍यातून गर्भित अर्थ निघेल असे ठेवत असतात. ही नावे ठेवण्‍यासाठी पालकांनाही मोठी कसरत करावी लागते. पूर्वीच्‍या काळी जगावेगळी नावं ठेवण्‍यासाठी पुस्‍तकं असायची. मग पालक बाजारातील अशी पुस्‍तकं शोधून काढत आणि आपल्‍या चिरंजीवांना किंवा सुपूत्रीला योग्‍य असं नाव (किमान त्‍यांना तरी वाटतं) ठेवत. आता तर एका क्लिकसरशी ही नावे कॉम्‍प्‍युटरच्‍या पडद्यावर अवघ्‍या काही सेकंदात मिळतात. काही मुलं आपल्‍या पालकांनी दिलेली नावे सार्थ ठरवतात तर काही आपल्‍या पाल्‍यांनाच तोंडावर पाडतात.

एवढया कष्‍टाने नाव दिल्‍यानंतरही आपल्‍या मुलाला टोपण नाव (निक नेम) ठेवण्‍याचीही प्रथा दिसून येते (जसं एखाद्या विद्यापीठाने मानद डॉक्‍टरेट पदवी द्यावी). ही टोपण नावे कधी घरातून तर कधी मित्रपरिवाराकडून मिळतात. तर कधी-कधी त्‍यांच्‍या कर्तुत्‍वाने (कोणते कर्तुत्‍व हे ज्‍याच्‍या-त्‍याच्‍या कर्माने ठरत असते).

सर्वसाधारणपणे पिंट्या, बाळ्या, गोट्या, वासू, दिग्‍या, सँडी, सोन्‍या... (आणखी बरंच काही) ही टोपण नावांची उदाहरणे आहेत. अशी टोपण नावे फक्‍त सर्वसामान्‍य लोकांनाच ठेवली जातात काय ? हा प्रश्‍न सगळयांनाच पडत असेल. तर याचे उत्तर नाही असे आहे. टोपण नावांची प्रथा ही जशी सामान्‍य लोकांमध्‍ये असते, तशीच सेलिब्रेटी, क्रिकेटपटू, बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्‍या, राजकीय पुढारींमध्‍येही असते. काहींना आधी म्‍हटल्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या कर्तुत्‍वामुळे किंवा चांगल्‍या कामगिरीमुळे टोपण नाव मिळते तर काहींना उपहासात्‍मक पद्धतीने ते दिले जाते.

भारतात क्रिकेट हा धर्म असल्‍याचे मानले जाते (यात नवीन काही सांगण्‍याचा प्रयत्‍न नाही). त्‍यामुळे या देशातील प्रत्‍येक माणसाला क्रिकेटपटूंविषयी खूप आत्‍मीयता आहे. प्रत्‍येकाचा एक हिरो आहे. काहीजण त्‍यांना देवही मानतात. या देवांनाही टोपण नावे आहेत. आज आपण अशाच काही भारतातील आणि विदेशातील काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्‍या टोपण नावाविषयी आणि त्‍यांना हे नाव कसं पडलं हे जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करूयात. 


अजित आगरकर- 'बॉम्‍बे डक'
ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या कसोटी मालिकेत सलग पाचवेळा बाद होण्‍याच्‍या विक्रमामुळे (त्‍यातील चारवेळा तो पहिल्‍याच चेंडूवर बाद झाला होता) त्‍याला 'बॉम्‍बे डक' ही पदवी मिळाली.
वीरेंद्र सेहवाग- 'मुलतान का सुलतान', 'नजफगडचा नवाब'
पाकिस्‍तानविरूद्ध मुलतान कसोटीत त्रिशतक केल्‍यामुळे त्‍याला 'मुलतान का सुलतान' हे नाव मिळाले. पाकिस्‍तानच्‍या मुलतानमध्‍ये त्‍याची फलंदाजी चांगलीच बहरते. त्‍याचबरोबर तो नजफगडचा असल्‍यामुळे त्‍याला नजफगडचा नवाबही म्‍हटले जाते.
ईशांत शर्मा- 'लंबू'
हाडकुळया आणि विचित्र हेअरस्‍टाईल असलेल्‍या ईशांत शर्माला त्‍याला उंचीमुळे 'लंबू' नावाने त्‍याचे सहकारी त्‍याला हाक मारतात. 6.5 फूट उंचीच्‍या या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 150 किमी प्रतितास वेगाने तर आयपीएलमध्‍ये 152.2 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकलेला आहे.

 जवागल श्रीनाथ - 'बाबू', 'म्‍हैसूर एक्‍स्‍प्रेस'
दक्षिण भारतात एखाद्याला मान द्यायचा असेल तर त्‍याला 'बाबू' नावाने पुकारतात. जवागल श्रीनाथ हा कर्नाटकचा असल्‍यामुळे त्‍याला हे नाव मिळाले. तसेच तो मुळचा म्‍हैसूरचा असल्‍यामुळे त्‍याला 'म्‍हैसूर एक्‍स्‍प्रेस' नावानेही ओळखले जाते. आपल्‍या वेगासाठी आणि रिव्‍हर्स स्विंगसाठी तो प्रसिद्ध होता. त्‍याने 67 कसोटीत 236 बळी आणि 229 वनडे सामन्‍यात 319 विकेट घेतल्‍या आहेत. कसोटीत त्‍याच्‍या नावे चार अर्धशतकांचीही नोंद आहे.
इंजमाम उल हक- 'आलु' (पोटॅटो)
पाकिस्‍तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकला त्‍याच्‍या स्‍थुल शरीरामुळे आलु म्‍हटले जात. बटा्टयासारखा वेडावाकडा वाढला असे म्‍हणत त्‍याच्‍यावर प्रेक्षक शेरेबाजी करीत.

काही वर्षांपूर्वी कॅनडा येथील टीम इंडियाविरूद्धच्‍या सहारा मालिकेवेळी एका प्रेक्षकाने इंजमामला बटा्टया म्‍हटल्‍यामुळे त्‍याने त्‍याला चांगलेच झोडपले होते.
सुरेश रैना- 'चेन्‍नई प्रिन्‍स'

टीम इंडियाचा टी-20 आणि वनडेमधील भरवशाचा फलंदाज असलेल्‍या रैनाला तामिळनाडूमध्‍ये 'चेन्‍नई प्रिन्‍स' नावाची पदवी देण्‍यात आली आहे. मुळचा कानपूरचा असला तरी आयपीएलमध्‍ये चेन्‍नई सुपरकिंग्‍ज टीमकडून तो खेळत असल्‍यामुळे तामिळनाडूमध्‍ये तो प्रचंड लोकप्रिय आहे.
नवज्‍योत सिंग सिंधू- 'शेरी', 'जॉंटी सिंग', 'सिक्‍सर सिद्धू'
भारतीय जनता पक्षाचा खासदार, क्रिकेट सामन्‍यावेळी आपल्‍या अनोख्‍या शैलीने म्‍हणी आणि शेरो-शायरीचा वापर करून समालोचन करणारा, सलामीला येऊन आपल्‍या फलंदाजीने टीम इंडियाला सावरणा-या नवज्‍योत सिंग सिद्धूला अनेक टोपण नावे आहेत.
रिकी पॉटिंग- 'पंटर'
रिकीला घोड्यांच्‍या आणि कुत्र्यांच्‍या शर्यतीवर बेटिंग करणे आवडत असल्‍यामुळे त्‍याला पंटर म्‍हटले जाते.

* राहुल द्रविड- 'द वॉल', 'मि. डिपेंडेबल', 'जॅमी'

प्रत्‍येकवेळी टीम इंडियाला संकटातून बाहेर काढणा-या राहुल द्रविडला मि. डिपेंडेबल म्‍हटले जात असत. कोणत्‍याही परिस्थितीत आपली विकेट गमवायची तर नाहीच शिवाय संघाला आवश्‍यक धावाही काढून द्यायचे, याचमुळे त्‍याला द वॉल म्‍हटले जात.
त्‍याचे वडील एका जॅम कंपनीत कामाला होते. त्‍यामुळे त्‍याला जॅमी हे टोपण नाव पडले होते.

* पार्थिव पटेल- 'बच्‍चा'

कसोटी इतिहासातील सर्वात तरूण यष्‍टीरक्षक (17 वर्षे 152 दिवस) पार्थिव पटेलने टीम इंडियात पर्दापण केले होते. कमी वय आणि बालिश चेहरा यामुळे त्‍याला 'बच्‍चा' म्‍हटले जात.

* व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मण- व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल
आपल्‍या भक्‍कम फलंदाजीच्‍या जोरावर त्‍याने टीम इंडियाला अनेकवेळा संकटातून बाहेर काढले असल्‍यामुळे त्‍याच्‍या नावाच्‍या पहिल्‍या तीन अक्षरांवरून त्‍याला व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल म्‍हटले जाते.

* मुथ्‍थय्या मुरलीधरन- 'द स्‍मायलिंग असेसन' म्‍हणजेच हसत मारणारा मारेकरी

* महेंद्रसिंह धोनी- 'कॅप्‍टन कुल', 'थाला' (तामिळ शब्‍द)

टीम इंडियाला क्रिकेटच्‍या तिन्‍ही प्रकारांत सर्वोच्‍च स्‍थानी नेणा-या तसेच टी-20, वनडेचे विश्‍वचषक जिंकून देणा-या कर्णधार महेंद्रसिंह धोनीला त्‍याच्‍या मैदानातील शांत स्‍वभावामुळे 'कॅप्‍टन कुल' म्‍हटले जाते.

त्‍याचबरोबर तो आयपीएलमध्‍ये चेन्‍नई सुपरकिंग्‍जचा कर्णधार असल्‍यामुळे तामिळ लोकांनी त्‍याला थाला हे नाव दिले आहे. थालाचा तामिळमध्‍ये मुख्‍य असा अर्थ होतो.

* हरभजन सिंग- 'द टर्बोनेटर', 'भज्‍जी'
सरदारजी असलेल्‍या हरभजनने आपल्‍या फिरकीने जागतिक क्रिकेटमध्‍ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्‍याच्‍या पगडीमुळे त्‍याला टर्बोनेटर म्‍हटले जाते. त्‍याचबरोबर त्‍याचे सहकारी त्‍याला लाडाने भज्‍जीही म्‍हणतात.

* सौरव गांगुली- 'दादा', 'द प्रिन्‍स ऑफ कोलकाता', 'बेंगाल टायगर'

टीम इंडियाचा सर्वात आक्रमक आणि यशस्‍वी कर्णधार ठरलेल्‍या सौरव गांगुलीला दादा म्‍हटले जाते. तो पश्चिम बंगालचा आहे आणि तिथे वयाने मोठया असलेल्‍या व्‍यक्‍तीला दादा म्‍हटले जाते. तो आक्रमक असल्‍यामुळे त्‍याला बेंगाल टायगरही म्‍हटले जात.

* सुनील गावसकर- 'सनी', 'लिटिल मास्‍टर'
बुटक्‍या चणीचा असला तरी आपल्‍या आपल्‍या फलंदाजीने उंची वाढवणा-या विश्‍वविक्रमी सुनील गावसकरला लिटिल मास्‍टर नावाने ओळखले जाते. त्‍याला सनीही म्‍हटले जाते.

* शोएब अख्‍तर- 'रावळपिंडी एक्‍स्‍प्रेस'
पाकिस्‍तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्‍तरला त्‍याच्‍या वेगामुळे त्‍याला रावळपिंडी एक्‍स्‍प्रेस म्‍हटले जात. तो मुळचा रावळपिंडीचा आहे.

* सचिन तेंडुलकर- 'मास्‍टर ब्‍लास्‍टर', 'द लिटिल मास्‍टर'
विश्‍वविक्रमी फलंदाज सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधील देव मानले जाते. युवापिढीचा आदर्श असलेल्‍या सचिनला त्‍याच्‍या सातत्‍यपूर्ण फलंदाजीमुळे आणि शॉट सिलेक्‍शनमुळे मास्‍टर ब्‍लास्‍टर म्‍हटले जाते. शतकांचा विश्‍वविक्रम करणा-या या फलंदाजाला लिटिल मास्‍टरही म्‍हटले जाते.

* डॉन ब्रॅडमन- 'द डॉन'

* दिलीप वेंगसरकर- 'कर्नल'
* सकलेन मुश्‍ताक- 'प्रोफेसर'
* वासिम अक्रम- 'सुलतान ऑफ स्विंग'
* लान्‍स क्‍लुजनर- 'झुलू'
* अनिल कुंबळे- 'जंबो'
* गुंडप्‍पा विश्‍वनाथ- 'विशी'
* रवी शास्‍त्री- 'शॅज'


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'