पोस्ट्स

पुन्हा 'कॅम्पा कोला' म्हणजेच 'The Great Indian Taste'

इमेज
थम्स अप, कोका कोला, पेप्सी आणि इतर कोल्ड ड्रिंकला टक्कर देण्यासाठी अंबानींनी म्हणजेच रिलायन्सने (Reliance) 'कॅम्पा कोला' (Campa Cola) रिलाँच केलं आहे (कॅम्पा ब्रँड हा तसा जुना आहे. रिलायन्सने तो खरेदी केला आहे.). त्यामुळे आता कोल्ड ड्रिंक कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा 'कोल्ड वॉर' सुरु होणार असं दिसतंय. रिलायन्स सध्या ज्या बिझनेसमध्ये उतरतंय (जियो वगैरे) ते पाहता या क्षेत्रातही आता 'कर लो दुनिया मुठ्ठी मैं' असंच होण्याची शक्यता आहे.  रिलायन्ससारखा ब्रँड कॅम्पा कोला घेऊन येतंय म्हटल्यावर आता या मार्केटमधील दिग्गज कंपन्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलली असणार. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत आता आपल्याला क्वॉलिटी, क्वाँटिटी, प्राइस त्याचबरोबर जाहिरात जगतात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कॅम्पा कोलाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण असणार याची उत्सुकता आता आहे आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडरसाठी रिलायन्स पैसा गुंतवायला मागे पुढे पाहणार नाही हे मात्र खरं आहे. जाहिरातीच्या दृष्टीने 'कॅम्पा कोला'वर थोडीशी नजर टाकूयात. कॅम्पा ब्रँड नावाचा फायदा घेण्यासाठी रिलायन्स जाहिरात करताना त्यांच्...

हवं तेवढं पॅकेज पाहिजे? मग सॅलरी ठरवताना द्या या गोष्टींकडे विशेष लक्ष

इमेज
 

योग्य करिअर निवडा या टिप्सच्या मदतीने

इमेज
  यश मिळवायचं असेल तर स्वतःसाठी योग्य कार्यक्षेत्र आणि अनुकूल करिअर निवडणे गरजेचे आहे (How to choose perfect career in marathi), पण हे साध्य कसं करायचं?, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. पण हा महत्त्वाचा निर्णय घेताना या गोष्टींकडे तुम्ही जरा लक्ष द्या:  स्वतःच्या योग्यतेकडे लक्ष द्या आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये रस किंवा इंटरेस्ट आहे, हे तपासून पाहा.  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्या. यामुळे तुम्हाला योग्य आणि वास्तविक माहिती मिळू शकते. याच्या मदतीने एक स्पष्ट लक्ष्य समोर ठेवून तुम्ही तुमचे करिअर निवडू शकता.  विविध क्षेत्रांचा अभ्यास करा आणि कोणत्या क्षेत्रात करिअर डेव्हलपमेंट आणि यश मिळण्याच्या चांगल्या संधी आहेत, हे तपासून पाहा.  जॉब वातावरण, पगार, स्थिरता आणि जॉब सिक्युरिटीचाही विचार करा. 

जगातील सर्वात मोठं स्कल्पचर केरळमधील 'जटायू अर्थ सेंटर'

इमेज
केरळ मधील कोल्लम शहरापासून अगदी जवळ जटायू अर्थ सेंटर (Jatayu Earth’s Center) इथं जटायूचं अत्यंत सुंदर आणि मोठं स्कल्पचर ( Jatayu Rock)  आहे. जगातील हे सर्वात मोठं स्कल्पचर असल्याचं सांगितलं जातं. पौराणिक कथेनुसार, ज्यावेळी रावण सीतेचं अपहरण करून नेत होता, त्यावेळी रावणाशी लढताना जटायू पक्षी खाली पडला होता. त्याच ठिकाणी हे स्कल्पचर आहे. हे स्कल्पचर ही अर्ध्या पंखाचं आहे. डोंगरावर हे स्कल्पचर उभारण्यात आलं आहे. हे स्कल्पचर 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 70 फूट उंच आहे. प्रख्यात मल्याळम फिल्ममेकर राजीव आंचल यांनी 15000 स्क्वेअर फूट प्लॅटफॉर्मवर हे उभारलं आहे. सुमारे 896 पायऱ्या चढून वर जावं लागतं. वर 6 D थिएटर, डिजिटल म्युझियम आहे, पण सध्या कोरोना मुळं हे बंद आहे. बाजूला प्रभू श्रीरामाचे रेखीव मंदिर आहे. वर जाण्यासाठी रोप वे ही आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, गेम झोन, आयुर्वेदिक रिसॉर्ट ही आहे. सर्वांनी पाहावं असं हे ठिकाण आहे...वर जाताना प्रत्येकाच्या फिटनेसचा कस लागतो, हे मात्र नक्की.. जवळचं विमानतळः त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सुमारे 52 किमी आहे. जवळचं रेल्वे स्टेशनः कोल्लम...

ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा'- Brandnama

इमेज
हल्ली प्रत्येक क्षेत्रात ब्रँड आणि ब्रँडिंगला खूप महत्त्व आलं आहे...स्पर्धा तीव्र झाली आहे..एकाच वस्तूची अनेक उत्पादनं बाजारात आहेत..प्रत्येक जण आपलं उत्पादन वेगळं आणि चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय...प्रत्येकाला त्याच्या उत्पादन, सेवांचा खप वाढवायचा आहे...सगळेजण मार्केटिंग करत आहेत..पण ब्रँडिंगकडे खूप कमी जणांचं लक्ष आहे...स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही वरवरची प्रक्रिया नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करुन आपला ब्रँड निर्माण केला जातो. आज ग्राहकांचाही ब्रँडेड वस्तू घेण्याकडे कल असतो. अनेकांचे उत्पादन चांगले असते पण त्यांचा ब्रँड नसल्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ब्रँडचे महत्त्व हळूहळू लोकांना पटायला लागले आहे..आता राजकारणातही ब्रँड तयार होत आहेत.  ब्रँड म्हणजे काय, ब्रँडिंग कसं केलं जातं ? याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात..यासाठी काय करायचं असतं हेही माहीत नसतं. ब्रँडबाबतची इत्यंभूत माहिती सहज, सोप्या भाषेत अभिजित जोग यांनी आपल्या 'ब्रँडनामा' या पुस्तकात मांडली आहे. अभिजित जोग हे जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव. पुण्यात प्रतिसाद कम्युनिकेशनच्या माध्यमातून गेल्या ३०...

कोरोना...वृत्तपत्र आणि बदललेली सवय

इमेज
गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी बदलल्या.. या काळात माझ्या करिअरनेही काही फेरबदल बघितले...सर्व काही सुरळित होत आहे असं वाटत असतानाच पहिल्या लाटेपेक्षाही भयानक अशी दुसरी लाट आली...आणि जवळचे आणि नेहमी संपर्कात असणारी लोकं सोडून जाऊ लागली...हे पचवणं खूपच अवघड होतं...हा आजार आता जवळ पोहोचला आहे...गेल्या वर्षी कोसो दूर असलेला हा कोरोना (Covid-19) आता अगदी दिवाणखान्यात पोहोचला आहे. यामुळे लोकांना सवयी बदलाव्या लागल्या आहेत. म्हणजे काही सवयी बदलाव्या लागल्या तर काही आपोआप बदलल्या.. कारण हा रोगच इतका भयानक आहे की, काही गोष्टी बदललेल्या आपल्याला जाणवतही नाही. पूर्वी घरी वृत्तपत्र आल्यानंतर आपण पहिलं पान आणि शेवटचं पान वाचण्याला प्राधान्य द्यायचो. परंतु, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने वृत्तपत्र वाचनाची सवयच बदलून टाकली आहे. आज कोणीही वृत्तपत्र समोर आल्यानंतर सर्वात आधी निधन वार्ता वाचतोय. कारण आता त्यातूनच अनेकांना आपल्या परिचितांच्या निधनाचे वृत्त समजत आहे. पूर्वी या कॉलममध्ये 3 ते 4 निधनाच्या बातम्या येत असत. आज या कॉलमची 'उंची' वाढली आहे. रोज 10 ते 15 निधन वार्ता प्रसिद्ध होत आहेत. वास्तवात...

तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य…

इमेज
प्रशासनातलं नेहमी चर्चेत असणारं नाव...तुकाराम मुंढे...कडक शिस्तीचे आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी असलेले मुंढेसाहेब...त्यांची धडाकेबाज कामगिरी सुरु झाली असे वाटत असते  अन् लगेच त्यांची बदली केली जाते... मग सरकार कोणाचेही असो... वाद आणि बदली अटळ... साधारणतः दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना असाच वाद झाला होता...राज्यातील सर्व माध्यमांत ते चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते... आताही अगदी तसंच आहे...त्यावेळी त्यांच्या झालेल्या बदलीवर लेख लिहिला होता...आज नागपूर महापालिकेची जबाबदारी घेऊन उणीपुरी काही महिने झाली होती...आणि वाद तर सुरुवातीपासूनच सुरु झाले होते..तोच त्यांची पुन्हा बदली झाली आहे...त्यामुळे नवी मुंबईतून बदली झालेल्या वेळचा लेख पुन्हा एकदा वाचकांसाठी... आताही तेच सुरु आहे.. फक्त शहर बदललंय..राजकारणी व्यक्ती बदललीत..पण मुंढे साहेबांचं 'टू बी कंटिन्यूय' सुरुच आहे.. - दिग्विजय जिरगे  रजतमसत्‍व आहे ज्‍याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥ तम म्‍हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ तुका म्‍हणे येथे सत्‍वाचे सामर्थ्‍य । क...