कोरोना...वृत्तपत्र आणि बदललेली सवय

गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी बदलल्या.. या काळात माझ्या करिअरनेही काही फेरबदल बघितले...सर्व काही सुरळित होत आहे असं वाटत असतानाच पहिल्या लाटेपेक्षाही भयानक अशी दुसरी लाट आली...आणि जवळचे आणि नेहमी संपर्कात असणारी लोकं सोडून जाऊ लागली...हे पचवणं खूपच अवघड होतं...हा आजार आता जवळ पोहोचला आहे...गेल्या वर्षी कोसो दूर असलेला हा कोरोना (Covid-19) आता अगदी दिवाणखान्यात पोहोचला आहे. यामुळे लोकांना सवयी बदलाव्या लागल्या आहेत. म्हणजे काही सवयी बदलाव्या लागल्या तर काही आपोआप बदलल्या.. कारण हा रोगच इतका भयानक आहे की, काही गोष्टी बदललेल्या आपल्याला जाणवतही नाही.


पूर्वी घरी वृत्तपत्र आल्यानंतर आपण पहिलं पान आणि शेवटचं पान वाचण्याला प्राधान्य द्यायचो. परंतु, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने वृत्तपत्र वाचनाची सवयच बदलून टाकली आहे. आज कोणीही वृत्तपत्र समोर आल्यानंतर सर्वात आधी निधन वार्ता वाचतोय. कारण आता त्यातूनच अनेकांना आपल्या परिचितांच्या निधनाचे वृत्त समजत आहे. पूर्वी या कॉलममध्ये 3 ते 4 निधनाच्या बातम्या येत असत. आज या कॉलमची 'उंची' वाढली आहे. रोज 10 ते 15 निधन वार्ता प्रसिद्ध होत आहेत. वास्तवात मृतांची संख्या जास्त आहे. पण वृत्तपत्रात पूर्वीच्या मानाने निधन वृत्ताची संख्या वाढताना दिसत आहे. (Corona Death News)


सध्याचा हा ट्रेंड काळजी आणि चिंता वाढवणारा आहे. व्हॉट्सअप ग्रूपवर रोज जवळच्यांना श्रद्धांजली वाहावी लागत आहे. ज्यांच्याबरोबर भेटी ठरल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या धक्का देणाऱ्या बातम्या वाचाव्या लागत आहेत. या कोरोनामुळे इतके हतबल झालो आहोत की, केवळ व्हर्च्युअल श्रद्धांजली वाहावी लागत आहे. ज्यांच्याबरोबर एकेकाळी एका ताटात जेवलो..त्यांच्या मृत्यूनंतर घरी ही जाता येईना. हा अत्यंत प्रतिकूल काळ सध्या दिसत आहे. कोरोना हाताळण्यास केंद्र आणि राज्य सरकार संपूर्ण अपयशी ठरली आहे. 


आता केवळ येणारा काळ चांगला असेल....चांगला बदल घडवणारा असेल या आशेवर सर्वजण आहेत...

- दिग्विजय जिरगे (Digvijay Jirage)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'