हवं तेवढं पॅकेज पाहिजे? मग सॅलरी ठरवताना द्या या गोष्टींकडे विशेष लक्ष

 



हवं तेवढं पॅकेज पाहिजे? मग सॅलरी ठरवताना द्या या गोष्टींकडे विशेष लक्ष

तुम्हाला salary discussion पूर्वी टेन्शन येतं का? जर तुमचं उत्तर होय असेल तर ते स्वाभाविकच आहे. पण काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास केवळ तुमची चिंता दूर होणार नाही तर तुम्हाला हवे ते पॅकेजही मिळवता येईल. हे कसे शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हेच पुढं मी सांगतोय. चला तर मग हे सर्व कसं शक्य आहे ते जाणून घेऊयात. 
  • सर्वात आधी तुम्ही तुमचा संपूर्ण फोकस interview वर केंद्रित करा. चांगल्या पॅकेजची इच्छा असणे वाईट नाही. पण त्याच्या आधी आपल्या interview वर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरुन या पोझिशनसाठी तुमच्यापेक्षा दुसरा कोणताच कँडिडेट योग्य नाही, हे तुम्हाला सिद्ध करता येईल. एखाद्या प्रश्नावर तुम्ही अडखळलात तर तुमच्या problem solving skills ची चुणूक तिथं दाखवून द्या. जेव्हा तुम्ही Clueless असाल तेव्हा नम्रपणे interviewer ला दुसऱ्या प्रश्नाकडे वळवा. 

  • प्रत्येक interview कडे एका conversation किंवा संवादाप्रमाणे पाहा. अनेक चांगले उमेदवार जेव्हा एका interview कडे चौकशीची प्रक्रिया म्हणून पाहतात, तेव्हा प्रेशरमध्ये ते बरोबर असलेले उत्तर ही आत्मविश्वासाने देऊ शकत नाही. त्यामुळे तेच त्यांच्या rejection चे कारण बनते. त्यामुळे एक संवाद डेव्हलप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचे best answers देता येतील. 

  • लक्षात ठेवा की industry standard तुमच्या प्रतिभेवरुन ठरत असतात आणि जर तुम्ही confident नसाल तर तुम्हाला यशस्वीपणे salary negotiate करता येणार नाही. एक safe figure तुमच्या मनात ठेवा आणि विचारल्यानंतर interviewer ला त्यामागील कारणे पटवून सांगा की ते impress होतील आणि तुम्ही तुम्हाला हवी असलेली salary negotiate करु शकाल. 

  • मी तुम्हाला माझ्या अनुभवावर या गोष्टी सांगितल्या. कदाचित तुम्ही प्रत्येक organization मध्ये यशस्वी होऊ शकणार नाहीत. असं अनेक वेळा होईल की तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे सॅलरी ऑफर होणार नाही. अशा परिस्थितीत सेफ फिगरची कन्स्पेट लक्षात ठेवा आणि जर ती मिळाली नाही. तर नम्रपणे ती ऑफर नाकारावी आणि मनात कोणताही किंतु-परंतु, किंवा अढी न ठेवता मुव्ह ऑन करावे. Interview experience मधून नवा धडा घ्यावा आणि आपल्या पुढच्या इंटरव्ह्यूवर लक्ष केंद्रित करावे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'