पोस्ट्स

आगाशे गुरूजी...

इमेज
मोहन आगाशे (Actor Mohan Agashe) अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते... माझा यांच्या बाबतीत एक योगायोग आहे... आतापर्यंत यांना तीन वेळा खूप जवळून पाहिलं..पण तिन्ही वेळेस ते एखाद्या बँके जवळ दिसले.. मग ती ब्लड बँक असो की आपली नेहमीची... पहिल्यांदा सुमारे 7 ते 8 वर्षांपूर्वी सोलापुरातील दमाणी ब्लड बँकेजवळ (Damani Blood Bank, Solapur) ते दिसले होते.. आयएमए मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते.. एकट्यानेच रस्त्यावरून जात होते... दुसऱ्यांदा म्हणजे 3 ते 4 महिन्यापूर्वी पुण्यातील शिवाजी नगरला म्हणजे आमच्या ऑफिसच्या खाली बँक ऑफ इंडिया म ध्ये ते आले होते.. बँकेतून बाहेर आल्यानंतर आपल्या ड्रायव्हर वर जरा चिडले होते... तिसऱ्यांदा म्हणजे आज ते मला डेक्कन येथील एसबीआय ब्रँच जवळ दिसले..यावेळी ते आपल्या तरुण सहकऱ्यासोबत गप्पा मारत येताना जवळून गेले... आता पाहू भविष्यात कुठं भेटतील 😊 - दिग्विजय जिरगे divijay,jirage@gmail.com Digvijay Jirage

जिद्दी आणि सपने..

इमेज
मुव्हीज ओकेवर सनी देओलचा जिद्दी चित्रपट लागलाय..कॉलेजला असताना आम्ही मित्रमंडळी भरपूर चित्रपट पाहायचो.. एकदा आम्ही दोन-तीन मित्र कामानिमित्त (म्हणजे काम एकाचं आणि आमची त्याच्यामागे सायकलवर वरात) बाहेर पडलो होतो.  सोलापुरात भागवत थिएटर आहे.. जिथे एकाच ठिकाणी ५ ते ६ टॉकिज आहेत. म्हणजे मल्टिफ्लेक्स ही संकल्पना येण्यापूर्वी किमान ५० ते ६० वर्षांपूर्वी सुरू झालेले हे थिएटर्स.. तर आमचं काम १२ पर्यंत उरकलं आणि सनीचे त्याकाळी आम्ही सगळेच फॅन असल्यामुळे जिद्दी चित्रपट पाहिला.. आणि लगेच त्यानंतरचा साडेतीनचा सपने हा दुसरा चित्रपट सलग पाहिला..म्हणजे १२.३० ते ३.३० आणि ३.३० ते ६.३० असे दोन शो पाहिले.. पहिल्यांदाच सलग दोन चित्रपट पाहण्याचा योग आला. त्यानंतर असे प्रयोग आम्ही अनेकवेळा केले.. मॉनिंग आणि मॅटिनी एकत्र पाहणे वगैरे..धम्माल यायची असलं काही करताना.. - दिग्विजय जिरगे 

बालाजी वेफर्स, भाजी मंडई आणि लादेन

इमेज
CODE NAME GERONIMO हा हॉलिवूडचा लादेनवरील चित्रपट उत्सुकतेपोटी पाहिला. पण चित्रपटाने घोर निराशा केली. हॉलिवूड पट खूप शिस्तीत आणि तयारीने केलेले असतात असं ऐकलंय.. पण या चित्रपटात असं काही झालं नसल्यासारखं दिसतं.. अमेरिकेबाहेरचं शुटिंग बहुधा सेकंड डायरक्टेरनं केलं असावं किंवा शुटिंग करताना ज्या गोष्टी टाळायला हव्यात त्याकडं दुर्लक्ष केलं असावं. चित्रपटाच्या सुरूवातीला काही चांगलं पाहायला मिळेल असं वाटलं होतं.. पण.. काही प्रसंग हे हिंदी चित्रपटातील कथानकाप्रमाणे आहेत.. पण चित्र पटातील सर्वांत दुबळी आणि वाईट गोष्ट म्हणजे चित्रपटासाठी पाकिस्तानमधील पेशावर, अबोटाबाद येथील जे प्रसंग दाखवले आहेत.. ते सर्व महाराष्ट्रातील आहेत.. ते असण्याबद्दल आक्षेपही नाही.. पण हॉलिवूडकरांनी एवढा मोठा चित्रपट बनवताना थोडीही काळजी घेतली नाही याचेच आश्चर्य वाटते. पाकिस्तानी कलाकारच्या भूमिकेत मराठी अभिनेते राजेश शृंगारपुरे, दुसरा एक ओळखीचा चेहरा आहे. शिवाय हर्ष छायांसारखा एक अनुभवी कलाकारही आहे. पण त्यांची भूमिका अवघ्या काही सेकंदाचीच आहे. पाकिस्तानातील जो पहिला प्रसंग दाखवलाय तिथंच हास्यास्पद अनुभव आल...

सामान्य भाजीविक्रेती ठरली शेतकऱ्यांसाठी आदर्श; ३ गुंठ्यात ५२ पिके घेण्याची साधली किमया

इमेज
अपुरा पाऊस, नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात आणि देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारकडून कर्जमाफी, पीक विमा आदी योजनांद्वारे बळीराजाला या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दुसरीकडे मात्र आत्महत्या काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कर्ते पुरूष कंटाळून आत्महत्येचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. पण इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर ही रडगाणी न गाता..अवघ्या काही गुंठ्यात..आदर्श आणि यशस्वी शेती कशी करता येते याचा वस्तूपाठच एका माऊलीने उभा केला आहे. मनीषाताई भांगे असे या माऊलीचे नाव असून त्यांनी खैरेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेती कशी करावी याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. अशिक्षीत असूनही एखाद्या कृषी तज्ज्ञाला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता अशा परिस्थितीलाही न डगमगता यशस्वी शेती करत त्यांनी शेतीपूरक उद्योगही उभा केला. अवघ्या ३ गुंठा शेतीत ५२ पिके घेण्याची किमया त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता त्यांनी सेंद्रिय शेती करून प...

सायकल

इमेज
पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत काही ठिकाणी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झालाय.त्यामुळे यंदा पालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज सायकली नाममात्र दरात भाड्याने दिली जात आहेत.. ही कॅशलेस योजना असून यासाठी पेटीएमचा वापर करावा लागतो. यासाठी पेडल ऍप डाउनलोड करावं लागतं. लॉगीन केल्यावर सायकल स्टँडवर किती सायकल उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. जीपीएसमुळे सायकलीचा ठावठिकाणा मिळतो. सायकल स्टँडवर सोडताना ती मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे ऍपच्या माध्यमातून अनलॉक करावी लागते. या सुविधेचा विद्यार्थी आणि युवक मोठ्याप्रमाणात उपयोग करून घेताना दिसतात. इतर शहरांनी या उपक्रमाचे अनुकरण करण्याची गरज आहे. - दिग्विजय जिरगे divijay.jirage@gmail.com  

भारतीय संगीतातील वादळ

इमेज
भारतीय संगीतातील वादळ अल्लारखाँ रहमान अर्थातच ए आर रहमान भारतीय चित्रपटसृष्टीतील दैवी देणगी लाभलेला संगीतकार. संगीतप्रेमी त्याला 'पूर्वेकडचा मोझार्ट' म्हणतात. 'रोजा' चित्रपटापासून सुरू झालेला रहमानचा हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. संगीतरचनेच्या रूढपद्धतीविरूद्ध बंड करणारी कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानावरील हुकूमत लाभलेल्या रहमानचा वैयक्तिक व व्यावसायिक प्रवास अत्यंत नाट्यमय असा आहे. आपल्या जादुई संगीतामुळे सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रहमानबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. परंतु, रहमानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणालाच जास्त माहिती नाही. किंबहुना ती माहिती बाहेर जाऊच नये असाच प्रयत्न केला गेला. 'ए आर रहमान- दी म्युझिकल स्ट्रॉम' या मूळ इंग्रजी व 'ए आर रहमान- संगीतातील वादळ' या मराठी अनुवादित पुस्तकातून एक वाद्य वाजवणारा दिलीप ते ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ए आर रहमान हा प्रवास उलगडण्यात आला आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका कामिनी मथाई या आहेत. तर मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे. रहमान व त्याच्...

'अमूल' मॅन- The Amul Man

इमेज
'अमूल' मॅन भारतात 'अमूल' हे नाव माहीत नसलेला व्यक्ती विरळाच. प्रत्येकाच्या घरी आणि ओठी असणारा हा ब्रँड. जगात काहीही घडलं तर त्यावर भाष्य करणाऱ्या 'अमूल'च्या जाहिरातीकडं सर्वांचं लक्ष असतंच. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणं असो किंवा अमूलच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्याचं काम, अगदी इमानेइतबारे ज्यांनी केलं ते डॉ. वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांनी. 'माझंही एक स्वप्न होतं..' हे त्यांचं आत्मचरित्र. यात त्यांनी आपलं बालपण ते 'अमूल'च्या उभारणीपासून देशातील धवलक्रांती व त्यानंतरच्या घटनांचा उल्लेख केला आहे. गौरी साळवी यांनी 'आय टू हॅड अ ड्रीम' (I To Had A Dream) या नावानं इंग्रजीत हे पुस्तक लिहिलंय. तर सुजाता देशमुख यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे.  एक अभियंता अपघातानं दुग्ध उत्पादनात आला आणि सहकाराच्या माध्यमातून त्यानं देशात धवलक्रांती घडवली. या वाटचालीत आलेल्या अनुभवाचे कथन या आत्मचरित्रातून होतं. डॉ. कुरियन यांचं ग्रामीण भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. दुग्धोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यात त...