जिद्दी आणि सपने..
मुव्हीज ओकेवर सनी देओलचा जिद्दी चित्रपट लागलाय..कॉलेजला असताना आम्ही मित्रमंडळी भरपूर चित्रपट पाहायचो.. एकदा आम्ही दोन-तीन मित्र कामानिमित्त (म्हणजे काम एकाचं आणि आमची त्याच्यामागे सायकलवर वरात) बाहेर पडलो होतो.
सोलापुरात भागवत थिएटर आहे.. जिथे एकाच ठिकाणी ५ ते ६ टॉकिज आहेत. म्हणजे मल्टिफ्लेक्स ही संकल्पना येण्यापूर्वी किमान ५० ते ६० वर्षांपूर्वी सुरू झालेले हे थिएटर्स.. तर आमचं काम १२ पर्यंत उरकलं आणि सनीचे त्याकाळी आम्ही सगळेच फॅन असल्यामुळे जिद्दी चित्रपट पाहिला.. आणि लगेच त्यानंतरचा साडेतीनचा सपने हा दुसरा चित्रपट सलग पाहिला..म्हणजे १२.३० ते ३.३० आणि ३.३० ते ६.३० असे दोन शो पाहिले.. पहिल्यांदाच सलग दोन चित्रपट पाहण्याचा योग आला. त्यानंतर असे प्रयोग आम्ही अनेकवेळा केले.. मॉनिंग आणि मॅटिनी एकत्र पाहणे वगैरे..धम्माल यायची असलं काही करताना..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा