सायकल










पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत काही ठिकाणी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झालाय.त्यामुळे यंदा पालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज सायकली नाममात्र दरात भाड्याने दिली जात आहेत.. ही कॅशलेस योजना असून यासाठी पेटीएमचा वापर करावा लागतो. यासाठी पेडल ऍप डाउनलोड करावं लागतं. लॉगीन केल्यावर सायकल स्टँडवर किती सायकल उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. जीपीएसमुळे सायकलीचा ठावठिकाणा मिळतो. सायकल स्टँडवर सोडताना ती मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे ऍपच्या माध्यमातून अनलॉक करावी लागते. या सुविधेचा विद्यार्थी आणि युवक मोठ्याप्रमाणात उपयोग करून घेताना दिसतात. इतर शहरांनी या उपक्रमाचे अनुकरण करण्याची गरज आहे.


- दिग्विजय जिरगे
divijay.jirage@gmail.com 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'