भागम भाग
१६० किलो वजन (माझ्या स्वत:चे ८५+ पाठीवर ३० ते ४० किलो+ हातात ४० किलो= १६०, वजनात कमी अधिक होऊ शकतं) घेऊन तेही रेल्वेच्या ट्रॅकवरून पळणे किती कठीण असते याचा प्रत्यय मला शनिवारी आला. चिंचवडवरून लोकलने पुण्याला येण्यासाठी एरवी अर्धा तास लागतो. परंतु शनिवारी जेव्हा मी ४.४५च्या लोकलने पुण्याकडे निघालो तेव्हा तब्बल सव्वा तास वेळ लागला. विशेष म्हणजे मी ज्या रेल्वेने पुढे जाणार होतो ती सहा वाजता निघणार होती. या लोकलने मनाचा मोठेपणा दाखवत दुसऱ्या रेल्वेंना मार्ग देण्यासाठी प्रत्येक ठ िकाणी १० ते १५ मिनिटांचा थांबा घेतला. याचा फटका माझ्यासारख्या अनेक "पापभिरू' प्रवाशांना बसला. ५.४५ला लोकल शिवाजीनगरला आली तेव्हा मला जरा हायसं वाटलं. कारण तिथून अवघ्या ५ मिनिटांत पुणे स्टेशन येते याची खात्री मला होती. परंतु तो दिवसच खराब होता असं म्हणता येईल. पुणे स्टेशन नजरेच्या टप्प्यात (सुमारे अर्धा किमी) होतं. पण लोकलने नेमका इथच घात केला. बया तिथंच थांबली. पुन्हा एका सिग्नलसाठी. त्या संपूर्ण लोकलमध्ये माझ्यासारख्या अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. हे जेव्हा मी लोकलमधून खाली उडी मारली तेव्हा मला ...