'ते' दिवस
मागचा पंधरवडा खूप भयावह गेला. दवाखाना कशाशी खातात माहीत नसलेला मी थेट आयसीयूचा अनुभव घेऊन आलो. (तसा अधूनमधून मी डॉक्टरांकडे जायचो पण आजारापेक्षा चेहऱयावरचे डाग, पोट साफ होत नाही किंवा जरा जास्तच साफ होतंय.. या पलीकडे कधी प्रसंगच आला नाही.) परवा अशाच काही कारणासाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी त्यांच्या लॅपटॉपवर माझी शेवटची नोंद दोन वर्षांपूर्वीची दाखवली (सध्या डॉक्टरांकडे ही एक चांगली सोय असते). शिवाय इतक्यात कोणाला पाहण्यासाठी हॉस्पीटलची चक्कर ही झाली नव्हती. मग हे झालंच कसं ?
तसा मी दिसायला तर एकदम धष्टपुष्ट. वजन चांगल 85 किलो (चूकभूल देणेघेणे). खाण्याच्या बाबतीतही एकदम चोंखदळ. (शेलका माल जरा जास्त लागतो). पण सातत्याचा अभाव. म्हणजे कसं वेळेवर काही खाणं नाही. आणि पत्रकारितेत असल्यामुळे झोपेचे त्रांगडं. भविष्यात ते कधी जमेल असं वाटतही नाही.
तर मग झालं असं आदल्यादिवशी रात्री पानं लावून (पान लावणे हे वृत्तपत्रात काम करणाऱयांना वेगळं सांगण्याची गरज नाही) घरी जाण्यास थोडा उशीरच झाला. खरं म्हटलं तर कामानंतरच्या गप्पांमुळे हा उशीर झाला. म्हणजे रात्री दोन वगैरे वाजले असतील (तरी बरं त्यादिवशी आम्ही चहा पिण्यासाठी स्टेशनवर गेलो नाही). घरी गेल्यानंतर झोप येण्यास तेथून किमान एक तास लागतो. म्हणजे मी साधारणपणे साडेतीनच्या सुमारास झोपलो. सकाळी आठच्या दरम्यान उठलो. तसा मी रोज प्रकृती सांभाळण्यासाठी, (कमावण्यासाठी नाही ) जिमला जातो. परंतु त्या दिवशी गेलो नाही. आईबरोबर जाऊन भाजी आणली. त्याचदरम्यान माझे सहकारी अप्पासाहेब हत्ताळे यांच्याबरोबर जाऊन काही पुस्तकांची खरेदी ही केली. उन्हाचा त्रास झाल्यामुळे न जेवता तसाच झोपले व दुपारी तीनच्या सुमारास उठून लगेच ऑफिसला गेलो. तेथेच गोची झाली. जेवणाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका मला संध्याकाळी बसला. रात्री सहकाऱयांबरोबर जेवण करतानाच मला त्रास होऊ लागला. हात थरथरू लागले, तोंड बधीर झाले, चक्कर आली, श्वास घेण्यास त्रास. ही लक्षणे पाहून माझ़्या सहकाऱयांनी लगेच मला डॉक्टरांकडे नेले. त्यांनीही प्रिकॉशन म्हणून मला हॉस्पीटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. इथंपर्यंत थोडंफार ठीक होतं.
तसा मी व्यवस्थित होतो. हॉस्पीटलमध्ये आणल्यानंतरही मी एकदम ओके. इतक्यात नकळत एका सिस्टरने माझ्या हातामध्ये सुई खुपसली. अचानक समोरून एक गर्दीचा लोंढा आला नि गेला. दोन-चार पोलिसही आले. काय झालं कळालं नाही. एका ब्रदरने मला व्हीलचेअरवर बसवले आणि सीटी स्कॅनसाठी नेलं. हे स्कॅन प्रकरण काय असतं हे तिथे मला गेल्यावर समजलं. त्या मशीनमध्ये गेल्यावर माझ़्या डोऴयासमोर मोठ-मोठया व्यक्तींचे चेहरे तरळले. मला त्या मशीनमध्ये ठेवण्यापूर्वी कोमामध्ये गेलेल्या पेशंटला ठेवण्यात आले होते. त्यामुळे 'थो्डीशीच' भीती वाटली. ते सोपस्कार पूर्ण करेपर्यंत आमच्या सौ. हॉस्पीटलमध्ये आल्या होत्या.मला त्या अवस्थेत पाहून त्यांचा बांध फुटला. आई सुरूवातीपासून माझ़्याबरोबरच होती. ती तशी धीट आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. इतकं होऊनही मी ओकेच.
दरम्यान तिकडे केसपेपर करणे वगैरे सुरू होतं. मगाशी जी गर्दी झाली होती. ती एका गोळीबार प्रकरणातील आहे असं समजलं. म्हणजे माझ़्यासमोर ज्याला नेलं होतं त्याच्यावर कोणीतरी गोळी झाडली होती. म्हणजे त्या अवस्थेतही मी थरार अनुभवत होतो. (खरा थरार पुढे आहेच)
केसपेपर झाल्यानंतर माझी रवानगी थेट न्युरो आयसीयूमध्ये. बापरे ! हेच शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडले. आयसीयूमध्ये गेल्यानंतर त्या थंड वातावरणातही मला घाम फुटला. मी गंभीर नसतानाही इथं का आणण्यात आणलं आहे हेच कळत नव्हतं. (त्याक्षणी मला तुरूंगात खितपत पडलेल्या हजारो निरपराध कैदी लोकांची आठवण झाली. कोणताही गुन्हा न करता हे लोकं खुनी, दरोडेखोर, गुंडांबरोबर कसं राहत असतील. असं मला राहून राहून डोऴयासमोर येऊ लागले.) माझ्या आजूबाजूला सर्व गंभीर पेशंट होते. मी ज्या कॉटवर होतो. त्याच्या उजव्या बाजूला रात्रभर एक पेशंट झटके देत होते. त्याचे हात-पाय बांधून ठेवले होते. डाव्या बाजूचा पेशंट सकाळपर्यंत विविध भाषेत विव्हळत होतो (कधी कन्न्ाड, कधी तेलगू, कधी हिंदी तर मध्येच मराठी). तर बाजूचा पेशंट सारखा पिण्यासाठी पाणी मागत होता. आणि यावर कहर म्हणजे तेथे डयुटीवर असलेल्यांची त्या पेशंटप्रती असलेला आदरभाव ? पाहून माझी खरतर फाटली होती. हा सर्व प्रकार पाहूनच मी स्वत:ला एका निरपराध कैदी समजू लागलो. माझ्या छातीला वेगवेगळी संयत्रे लावलेली. आतापर्यंत टीव्हीमध्ये एखाद्याला ऑक्सिजन लावलेला पाहिला होतो. ती हौस इथे पूर्ण करून घेतली. मी नको नको म्हणत असतानाही मला बळजबरीने तो लावण्यात आला. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे मला संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.
सकाळी एकदाचं मला शिप्ट केलं. पुढील तीन दिवस शरीराच्या निरनिराऴया चाचण्या घेण्यात आल्या. जेथे शिप्ट केले होते. तेथेही बरोबर गंभीर आजाराचा सहकारी पेशंट. त्यामुळे हॉस्पीटलमधील प्रत्येक क्षण हा मला हॉरर चित्रपटाचा अनुभव घेण्यासारखा होता. आणखी एक, अनेक जणांना गुजराथी थाळी खाण्याचा अनुभव असेलच. तिथे कसं तुमचं ताट भरलेले असलं तरी समोर वाढप्यांची गर्दी असते. प्रत्येक पदार्थासाठी त्यांचा आग्रह असतो. प्रेमाने आणि बळजबरीने भरवण्याचा प्रकार तेथे होत असतो. हे सर्व अगत्य पाहूनच जेवणाऱयाचे पोट भरते. असाच अनुभव या चार दिवसांच्या मुक्कामात मला आला. सातत्याने मुख्य डॉक्टरांचे साहाय्यक, ब्रदर, सिस्टर, मग डॉक्टर हे येत असल्याने आपण खरच आजारी असल्याची जाणीव होते.
औषधांच्या मारा़यामुळे थोडेसे दुष्परिणाम झाले. पण डबल हाडाचा असल्याने त्यातूनही लवकरच सावरलो. अशा गोष्टीचा मला काडीमात्र अनुभव नव्हता. कोणावर अशी वेळ येऊही नये. त्या रात्री माझे सहकारी राकेश कदम, रामदास काटकर व अप्पू शिमगे यांच्या सहकार्यामुळे घरच्यांना कोणतीच अडचण आली नाही. हॉस्पीटलमधील माझे ते दिवस 'मंतरलेले' नसले तरी 'तंतरलेले' मात्र नक्कीच होते.

_2007-03-03.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा