पोस्ट्स

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'

इमेज
आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटपटू विजय झोल. टीम इंडियाला अंडर 19 चे विश्‍वविजेतेपद मिळवून देण्‍यात महत्‍वाची भूमिका निभाणा-या विजयची घेतलेली मुलाखत...   'विजय झोल' गेल्‍या एक-दोन वर्षांपासून क्रिकेटच्‍या क्षितिजावर सतत झळकणारे हे नाव. मराठवाड्यातील जालना सारख्‍या एका छोटयाशा शहरातून क्रिकेटसाठी कोणत्‍याही प्रकारचे पोषक वातावरण नसतानाही फक्‍त गुणवत्तेच्‍या जोरावर पुढे आलेला हा खेळाडू. मैदानात फलंदाजीस गेल्‍यानंतर खंडीभर धावा केल्‍याशिवाय परत न येणारा खेळाडू अशी त्‍याची क्रिकेटच्‍या दुनियेतली ओळख. 'सातत्‍य' म्‍हणजे विजय झोल हे आता समीकरणच बनले आहे. आपल्‍या फलंदाजीतील सातत्‍यामुळे प्रत्‍येकाच्‍या ओठावर त्‍याचे नाव आहे. आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वडील हरी झोल हेच आपले आयकॉन असल्‍याचे सांगणारा विजय आपल्‍या खेळाचे सर्व श्रेय जालन्‍याचे प्रशिक्षक राजू काणे यांना देतो. विजय पहिल्‍यांदा प्रकाशझोतात आला कुचबिहार करंडकातील 451 धावांच्‍या नाबाद विक्रमी खेळीमुळे. आपल्‍या डावखु-या फलंदाजीने भल्‍या-भल्‍या गोलंदाजांच्‍या तोंडचे पाणी पळवणा-या विजयने ऑस्‍ट्रेलियातील 19 व...

... आणि बाळासाहेबांना पुन्‍हा भेटण्‍याची इच्‍छा अपुरीच राहिली

इमेज
महाराष्‍ट्राची आंतरराष्‍ट्रीय कबड्डीपट्टू सुवर्णा बारटक्‍के हिची घेतलेली मुलाखत...  कबड्डी खेळात महाराष्‍ट्राची विशाल अशी परंपरा आहे. चपळ हालचाल, श्‍वास रोखून धरण्‍याची क्षमता, समयसूचकता, सांघिक कौशल्‍य आणि यासर्वांसाठी लागणारी शाररिक क्षमता महाराष्‍ट्राच्‍या खेळाडूंमध्‍ये ठासून भरलेली दिसते. या खेळात महाराष्‍ट्राच्‍या मातीने अनेक मोहरे देशाला दिले. पुरूषांबरोबरच महिला खेळाडूंनीही ही गौरवशाली परंपरा कायम ठेवली. त्‍यातीलच एक नाव सुवर्णा बारटक्‍के (Suvarna Bartakke). कबड्डी हाच श्‍वास असलेल्‍या सुवर्णाने मार्च महिन्‍यात झालेल्‍या पहिल्‍या महिला कबड्डी विश्‍वचषकाचे भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्‍यात महत्‍वाची भूमिका निभावली. तिच्‍या या यशाबद्दल जाणून घेण्‍यासाठी जेव्‍हा सुवर्णाला फोन केला तेव्‍हा बोलता बोलता आपसुकच बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) विषयही निघाला. मग गत आठवणींना उजाळा देताना भावुक झालेल्‍या सुवर्णाने भविष्‍यात चांगली कामगिरी केल्‍यानंतर बाळासाहेबांचे आर्शिवाद घेता येणार नाही, अशी खंत व्‍यक्‍त केली. भाऊ कबड्डीपटू त्‍यामुळे या ...

आमचा विसरभोळा भाई !

इमेज
शीर्षक वाचून तुम्‍हाला मी महाराष्‍ट्रातील लाडके व्‍यक्‍तीमत्‍व पुलं विषयी बोलत असेल असं वाटेल. पण तसं नाही (कानाला हात लावून) मी ज्‍या भाईविषयी सांगणार आहे तोही काही असा-तसा नाही. तोही तोडीस तोड आहे (म्‍हणजे गुंड वगैरे नाही, गैरसमज नको). हे भाई कसे आहेत हे तुम्‍हाला पुढं लक्षात येईलच. आमचा भाई म्‍हणजे उन्‍मेष खंडाळे.  उन्‍मेष हे त्‍याचे नाव आहे. सुरूवातीला भाई कसा लागला मला माहीत नाही. पण सगळे पूर्वीपासूनच त्‍याला भाई म्‍हणतात. मला अनेकवेळा उत्‍सुकता होती भाई नावाचा इतिहास जाणून घेण्‍याची पण विचारायचे राहूनच गेले (कदाचित आता माहित होईल, असे गृहीत धरतो). उन्‍मेषला 'भाई' ही उपाधी खूप प्रिय आहे. याची प्रचिती तुम्‍ही त्‍याला फोन लावल्‍यानंतर लक्षात येईल. रेकॉर्डरूपी बाई समोरून सारखं भाई उन्‍मेषला फोन लावल्‍याबद्दल आपले आभार मानीत असते.  त्‍याशिवाय त्‍याचं फेसबुक प्रोफाईलही 'भाई' या नावानेच सुरू होते.(यावरून तुम्‍हाला पुसटशी कल्‍पना येईल). भाईविषयी अधिक सांगायचं म्‍हटलं तर तो आणि मी समवयीनच आहोत. पण तो गेल्‍या पाच-साडेपाच वर्षांपासून पत्रकारितेत आहे. सुरूवातीला प्रिंट मीड...

नकटीच्‍या लग्‍नाला.....

इमेज
औरंगाबादमध्‍ये येऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला. या कालावधीत अनेक संकल्‍प केले. काही तडीस नेले, काही नेण्‍याचा प्रयत्‍न केला. काही तर क्षणातच विसरला गेलो. पण एक इच्‍छा किंवा संकल्‍प अजूनही मनात घर करून आहे. तो म्‍हणजे सकाळी लवकर उठून मोकळया वातावरणात फिरायला जाण्‍याचा (जरासं वजन वाढल्‍यामुळे). कारण इथे आल्‍यापासून अनेक गोष्‍टी मी हरवून बसलोय. सकाळी एकदा ऑफिसला गेल्‍यानंतर रात्री फ्लॅटवर कधी जाईल याची मलाच माहिती नसते. कारण तिथे जाऊन तर काय करणार हा ही मोठा प्रश्‍नच. जाऊ दे खूप भरकटतोय, माझ्या वरच्‍या संकल्‍पासारखा. त्‍यामुळे परत मुद्यावर येतो. तर सकाळी लवकर उठून फिरायला जाण्‍यासाठी झोपताना अनेकवेळा ठाम ठरवलं. पण स्‍वत: झोपण्‍याबरोबरच तो संकल्‍प देखील तेव्‍हाच झोपायचा. त्‍यामुळे मग सकाळी उठल्‍यानंतर ऑफिसच्‍या टाईमिंगप्रमाणे थोडाफार व्‍यायाम तो ही कधीतरी (म्‍हणजे माझ्या पद्धतीने थोडे फार हात-पाय वाकडे करणे, दोन-तीन उडया मारणे आणि मोजून 20-25 जोर मारणे) करणे. त्‍यातही सातत्‍य नव्‍हते. जुन्‍या फ्लॅट पार्टनरबरोबर अनेकवेळा याबाबत मोठया लंबयाचौड्या गप्‍पादेखील (म्‍हणजे रोज व्‍यायाम क...

टीम अण्‍णांचा राजकीय धोबीपछाड

इमेज
मागील काही दिवसांपासून टीम अण्‍णा आणि संसद यांच्‍यातील वाद विकोपाला गेल्‍याचे दिसून येते. टीम अण्‍णातील प्रत्‍येक सदस्‍य खासदारांच्‍या विशेषाधिकारालाच आव्‍हान देत असून, त्‍यांच्‍याविरूद्ध ते दररोज काहीना काही तरी वादग्रस्‍त विधाने करीत आहेत. त्‍यामुळे संसदेतही टीम अण्णाविरूद्ध मोठया प्रमाणात गोंधळ होत असल्‍याचे दिसते. शरद यादव, लालुप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यासारख्‍यांनी टीम अण्‍णांवर लोकसभेत मोठया प्रमाणावर टीका केली. म्‍हणजे ज्‍या पक्षांनी टीम अण्‍णांच्‍या लोकपालला संसदेत पाठिंबा दिला होता, तेही आज त्‍यांच्‍याविरोधात बोलताना दिसतात. कारण सरळ आहे, टीम अण्णाने त्‍यांच्‍या चारित्र्यावरच घाला घातला. त्‍यामुळे सा‍हजिकच ते विरोधात बोलणारच. पण टीमच्‍या सदस्‍यांनी हे जाणूनबुजून केलेले वक्‍तव्‍य आहे. त्‍यांना परिणामांची कल्‍पना असतानाही त्‍यांनी असे बोलण्‍याचे धाडस केले. म्‍हणजे त्‍यांनीच संसदेला पर्यायाने खासदारांना कोंडीत पकडण्‍याचे काम केले आहे. ते कसं? मुंबईतील अयशस्‍वी उपोषणानंतर काही दिवस अज्ञातवासात गेलेल्‍या टीमअण्‍णा ...

महापालिका रणांगण: नवे कारभारी निवडताना पुणेकरांचाच लागणार कस!

इमेज
तुमचे मत पुणे महापालिकेत कोणता पक्ष सत्तेवर येईल, असे वाटते? कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप-शिवसेना-रिपब्लिकन पक्ष महायुती महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्‍याची जनता 'सवाई' आहे, असे म्‍हटले जाते. परंतु, त्‍यांनीच निवडून दिलेले सत्ताधारी त्‍यांच्‍यापेक्षाही 'सवाई' निघालेत. गेल्‍या पाच वर्षांत विकासाच्‍या नावाखाली सामान्‍यांना झुलवत ठेऊन अनोखा 'पुणे पॅटर्न' राबवून जनतेलाच वेठीस धरणा-या राजकीय पक्षांनी आता 16 फेब्रुवारीसाठी नव्‍याने रणशिंग फुंकलंय. विरोध करण्‍यासाठी विरोधी पक्ष नसलेली पुणे महानगरपालिका कदाचित देशातील एकमेव महानगरपालिका असेल, कारण गेल्या पाच वर्षात येथे जवळपास प्रत्येक पक्षाने सत्तेची ऊब घेतलीये. पुणे शहर खरचं देशातील एक 'अनोखं' शहर ठरू पाहातयं. शहरातील राजकीय परिस्थिती पाहिल्‍यास याचं 'अनोखं'पण आपल्‍या लक्षात येईल. खासदार भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपाखाली तुरूंगात त्‍यामुळे संसदेत शहराचे नेतृत्‍वच नाही तर राष्‍ट्रवादीच्‍या हातात महानगरपालिका असूनही अंतर्गत ग...

महापालिकेचे रणांगणः विकासाची वाट लावणा-या 'पुणे पॅटर्न'ला जीवदान मिळणार?

इमेज
विद्येचे आणि राज्‍याचे सांस्‍कृतिक माहेरघर असलेले पुणे आता राजकारणातील नव्‍या प्रयोगांचेही माहेरघर ठरले आहे. जे पक्ष राज्‍यात एकमेकांविरोधात टीकेची झोड उडवतात तेच पक्ष येथे गळयात गळा घालून सत्‍ता उपभोगताना दिसतात. गंमतीने असे म्‍हटले जाते की, पुणे महापालिकेत सर्वच पक्ष सत्‍ताधारी आणि सर्वच पक्ष विरोधी बाकावर आहेत. 'पुणे पॅटर्न' ने तर राज्‍यात खळबळ माजवून दिली होती. पुण्‍यात राष्‍ट्रवादीची सर्व सूत्रे राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या हातात आहेत. कॉंग्रेसची धूरा इतकेदिवस खासदार सुरेश कलमाडी यांच्‍या हातात होती पण राष्‍ट्रकूल घोटाळयाप्रकरणी तुरूंगात गेल्‍यापासून कॉंग्रेसची नौका नेतृत्‍वाअभावी भरकटत आहे. कॉंग्रेसला पर्यायाने कलमाडींना सत्‍तेवर येऊ द्यायचे नाही या एकमेव ध्‍येयाने पछाडलेल्‍या पवारांनी प्रसंगी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जवळ केले आणि राज्‍यात 'पुणे पॅटर्न' पर्वास सुरूवात केली. शिवसेना आणि भाजपलाही सत्‍तेत येण्‍यासाठी अशा पॅटर्नची गरजच होती. औद्योगिक विकासाबरोबर पुण्‍याच्‍या समस्‍यादेखील मोठयाप्रमाणात वाढल्‍या. माहिती तंत्रज्ञाना...