विंडिजचा संघ 2018 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात विंडीजची कामगिरी ढासळली होती. त्यावेळी वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज जिमी अॅडम्सची आठवण आली होती. त्याच्या कामगिरीवर त्यावेळी लिहिलेला लेख पुन्हा एकदा सादर.. - दिग्विजय जिरगे. हा तोच संघ आहे का ज्याने एकेकाळी आपल्या धारदार गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जगातील सर्व संघांवर वर्चस्व गाजवले होते..हा प्रश्न सध्याच्या वेस्ट इंडिज संघाकडे पाहिल्यानंतर क्रिकेट रसिकांना पडला असेल. गॅरी सोबर्स, क्लाइव लॉइड, गार्डन ग्रिनिज, व्हिव्ह रिचर्डस, माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, कर्टली अम्ब्रोज, कर्टनी वॉल्श, ब्रायन लारा, चंदरपॉल असे एकशे एक उत्तम दर्जाचे आणि आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी भरवणारे खेळाडू होते. या परंपरेत मोडत नसला तरी आणखी एक खेळाडु होता, ज्याची कामगिरी इतर संघांबरोबर बऱ्यापैकी होती. पण भारताविरोधात मात्र एक्स्ट्रा ऑर्डनरीच होती. तो या महान खेळाडुंच्या पंक्तीत मोडत नसला तरी १९९४ मध्ये भारतीय संघाला घाम फोडणारा तो हाच फलंदाज.. त्याचे नाव जिमी अॅडम्स.. राजकोटमध्ये अवघ्या ३ दिवसांत टीम इंडियाने विंडीजल...