पोस्ट्स

ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा'- Brandnama

इमेज
हल्ली प्रत्येक क्षेत्रात ब्रँड आणि ब्रँडिंगला खूप महत्त्व आलं आहे...स्पर्धा तीव्र झाली आहे..एकाच वस्तूची अनेक उत्पादनं बाजारात आहेत..प्रत्येक जण आपलं उत्पादन वेगळं आणि चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय...प्रत्येकाला त्याच्या उत्पादन, सेवांचा खप वाढवायचा आहे...सगळेजण मार्केटिंग करत आहेत..पण ब्रँडिंगकडे खूप कमी जणांचं लक्ष आहे...स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही वरवरची प्रक्रिया नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करुन आपला ब्रँड निर्माण केला जातो. आज ग्राहकांचाही ब्रँडेड वस्तू घेण्याकडे कल असतो. अनेकांचे उत्पादन चांगले असते पण त्यांचा ब्रँड नसल्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ब्रँडचे महत्त्व हळूहळू लोकांना पटायला लागले आहे..आता राजकारणातही ब्रँड तयार होत आहेत.  ब्रँड म्हणजे काय, ब्रँडिंग कसं केलं जातं ? याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात..यासाठी काय करायचं असतं हेही माहीत नसतं. ब्रँडबाबतची इत्यंभूत माहिती सहज, सोप्या भाषेत अभिजित जोग यांनी आपल्या 'ब्रँडनामा' या पुस्तकात मांडली आहे. अभिजित जोग हे जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव. पुण्यात प्रतिसाद कम्युनिकेशनच्या माध्यमातून गेल्या ३०...

कोरोना...वृत्तपत्र आणि बदललेली सवय

इमेज
गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी बदलल्या.. या काळात माझ्या करिअरनेही काही फेरबदल बघितले...सर्व काही सुरळित होत आहे असं वाटत असतानाच पहिल्या लाटेपेक्षाही भयानक अशी दुसरी लाट आली...आणि जवळचे आणि नेहमी संपर्कात असणारी लोकं सोडून जाऊ लागली...हे पचवणं खूपच अवघड होतं...हा आजार आता जवळ पोहोचला आहे...गेल्या वर्षी कोसो दूर असलेला हा कोरोना (Covid-19) आता अगदी दिवाणखान्यात पोहोचला आहे. यामुळे लोकांना सवयी बदलाव्या लागल्या आहेत. म्हणजे काही सवयी बदलाव्या लागल्या तर काही आपोआप बदलल्या.. कारण हा रोगच इतका भयानक आहे की, काही गोष्टी बदललेल्या आपल्याला जाणवतही नाही. पूर्वी घरी वृत्तपत्र आल्यानंतर आपण पहिलं पान आणि शेवटचं पान वाचण्याला प्राधान्य द्यायचो. परंतु, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने वृत्तपत्र वाचनाची सवयच बदलून टाकली आहे. आज कोणीही वृत्तपत्र समोर आल्यानंतर सर्वात आधी निधन वार्ता वाचतोय. कारण आता त्यातूनच अनेकांना आपल्या परिचितांच्या निधनाचे वृत्त समजत आहे. पूर्वी या कॉलममध्ये 3 ते 4 निधनाच्या बातम्या येत असत. आज या कॉलमची 'उंची' वाढली आहे. रोज 10 ते 15 निधन वार्ता प्रसिद्ध होत आहेत. वास्तवात...

तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य…

इमेज
प्रशासनातलं नेहमी चर्चेत असणारं नाव...तुकाराम मुंढे...कडक शिस्तीचे आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी असलेले मुंढेसाहेब...त्यांची धडाकेबाज कामगिरी सुरु झाली असे वाटत असते  अन् लगेच त्यांची बदली केली जाते... मग सरकार कोणाचेही असो... वाद आणि बदली अटळ... साधारणतः दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना असाच वाद झाला होता...राज्यातील सर्व माध्यमांत ते चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते... आताही अगदी तसंच आहे...त्यावेळी त्यांच्या झालेल्या बदलीवर लेख लिहिला होता...आज नागपूर महापालिकेची जबाबदारी घेऊन उणीपुरी काही महिने झाली होती...आणि वाद तर सुरुवातीपासूनच सुरु झाले होते..तोच त्यांची पुन्हा बदली झाली आहे...त्यामुळे नवी मुंबईतून बदली झालेल्या वेळचा लेख पुन्हा एकदा वाचकांसाठी... आताही तेच सुरु आहे.. फक्त शहर बदललंय..राजकारणी व्यक्ती बदललीत..पण मुंढे साहेबांचं 'टू बी कंटिन्यूय' सुरुच आहे.. - दिग्विजय जिरगे  रजतमसत्‍व आहे ज्‍याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥ तम म्‍हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ तुका म्‍हणे येथे सत्‍वाचे सामर्थ्‍य । क...

जिमी जिमी जिमी आजा आजा..

इमेज
विंडिजचा संघ 2018 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात विंडीजची कामगिरी ढासळली होती.  त्यावेळी वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज जिमी अ‍ॅडम्सची आठवण आली होती. त्याच्या कामगिरीवर त्यावेळी लिहिलेला लेख पुन्हा एकदा सादर.. - दिग्विजय जिरगे. हा तोच संघ आहे का ज्याने एकेकाळी आपल्या धारदार गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जगातील सर्व संघांवर वर्चस्व गाजवले होते..हा प्रश्न सध्याच्या वेस्ट इंडिज संघाकडे पाहिल्यानंतर क्रिकेट रसिकांना पडला असेल. गॅरी सोबर्स, क्लाइव लॉइड, गार्डन ग्रिनिज, व्हिव्ह रिचर्डस, माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, कर्टली अम्ब्रोज, कर्टनी वॉल्श, ब्रायन लारा, चंदरपॉल असे एकशे एक उत्तम दर्जाचे आणि आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी भरवणारे खेळाडू होते. या परंपरेत मोडत नसला तरी आणखी एक खेळाडु होता, ज्याची कामगिरी इतर संघांबरोबर बऱ्यापैकी होती. पण भारताविरोधात मात्र एक्स्ट्रा ऑर्डनरीच होती. तो या महान खेळाडुंच्या पंक्तीत मोडत नसला तरी १९९४ मध्ये भारतीय संघाला घाम फोडणारा तो हाच फलंदाज.. त्याचे नाव जिमी अ‍ॅडम्स.. राजकोटमध्ये अवघ्या ३ दिवसांत टीम इंडियाने विंडीजल...

हा खेळ आकड्यांचा...

इमेज
काही गोष्टी आयुष्यात काही क्षणांसाठी येऊन जातात. पण त्याच्या आठवणी मात्र कायम आपल्याबरोबर राहतात. लेखाची सुरुवात जरी अशी असली तरी पुढचा सगळा भाग अनैतिक गोष्टींचा आहे. अनैतिक (सरधोपट अर्थ घेऊ नका) म्हणजे महाविद्यालयीन जीवनात असताना आम्ही मित्रमंडळींनी काय-काय केलं होतं, त्या आठवणीपैकी एक अशी आठवण जी विसरणं शक्यच नाही..या आठवणींना उजाळा मिळाला तो रतन खत्री नावाच्या एका कुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनाच्या बातमीमुळं... आता हा खत्री कशासाठी प्रसिद्ध होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही... खत्रीनं जग सोडलं.. पण त्यापूर्वी म्हणजे सुमारे १८ ते २० वर्षांपूर्वी १५ दिवस तोही आमच्या आयुष्यात येऊन गेला.. त्याने आमच्याकडून आकडेमोड करुन घेतली. त्याचं गणित आम्हाला काही रुचलं नाही किंवा जमलं नाही असंही म्हणता येईल.. पण त्यामुळं सांख्यिकीतज्ज्ञ होता-होता थोडक्यात वाचलो. साधारणतः २०००- २००१ सालची ही गोष्ट आहे.. आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आम्ही काही मित्रांनी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता (वडिलांचं स्वप्न होतं. पोरगं घरात वाद घालताना वकिली पाँईंटने वाद घालतो..त्याला वकिली व्यवसाया...

कोरोना संपणार..पण पिळवणूक अटळ..

इमेज
येणाऱ्या काही दिवसांत कोरोना (CoronaVirus) विषाणू निघूनही जाईल. पण त्यानंतर ज्या अडचणी सुरु होणार आहेत, त्या कल्पनेपलिकडच्या असू शकतील. सध्या यात हातावर पोट असणारे भरडले जात आहेत. त्यानंतर वेळ येईल खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची. मार्च-एप्रिल महिना उजाडताच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागलेले असतात. म्हणजे अप्रायझलसाठी या काळाची सर्वचजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. बहुतांश ठिकाणी सालाबादप्रमाणे यासाठीचे सर्व सोपस्कार सुरु होते. पण मध्येच या कोरोना विषाणूरुपी किड्याने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम व्यवस्थित केले आहे. दरवर्षी 'कॉस्ट कटिंग'चे कारणे देऊन किरकोळ पगारवाढ केली जात. यंदा पगारवाढ लांबच पगार कपातीची भाषा आत्ताच बोलली जात आहे. किंबहुना नोकरीच धोक्यात आली असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईएमआय, जबाबदाऱ्या या इतर आर्थिक गोष्टींमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे कोणाच्याच हाती काही नाही, अशी परिस्थिती सध्यातरी आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे खऱ्या अर्थाने पिळवणुकीचे दिवस आता सुरु होणार आहेत किंबहुना...

सब मोह.. माया.. और ममता..

इमेज
राष्ट्रीय राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. देशाच्या राजकारणात काँग्रेस-भाजपा हे जरी प्रमुख पक्ष असले तरी माया-ममता-जयललिता यांचा मोठा दबदबा होता आणि आहे. यातील जयललिता यांचं निधन झालं, त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात थोडीशी पोकळी निर्माण झाली आहे. पण मायावती आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या अजूनही त्यांच्या विरोधकांना स्वस्थ बसू देत नाहीत. तिकडं दिल्लीत असं सुरू असताना.. इकडं आमच्या गल्लीतल्या व्हॉट्सअप ग्रूपवरही यावरुन प्रचंड वाद होताना दिसतात.. एकवेळ काही गोष्टींसाठी भाजपा-काँग्रेस किंवा तमाम विरोधी पक्ष एकत्र येतील.. परंतु, व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर केलेल्या टिप्पणीमुळे मित्रा-मित्रांमध्ये तणावाचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. असो.. सांगण्याचा मुद्दा हा आहे की या राजकारणाने मैत्रीत वितुष्ठ निर्माण होत आहे.. दर आठवड्याला पुणे-सोलापूर-पुणे माझी वारी असते. बहुतांशवेळा हा प्रवास रेल्वेने होतो.. क्वचितप्रसंगी एसटीनेही मी जातो. मध्यंतरी मी नेहमीप्रमाणे पुण्याहून हुतात्मा एक्स्प्रेसने सोलापूरला येत होतो. माझ्या आरक्षित आसनाशेज...