पोस्ट्स

हा खेळ आकड्यांचा...

इमेज
काही गोष्टी आयुष्यात काही क्षणांसाठी येऊन जातात. पण त्याच्या आठवणी मात्र कायम आपल्याबरोबर राहतात. लेखाची सुरुवात जरी अशी असली तरी पुढचा सगळा भाग अनैतिक गोष्टींचा आहे. अनैतिक (सरधोपट अर्थ घेऊ नका) म्हणजे महाविद्यालयीन जीवनात असताना आम्ही मित्रमंडळींनी काय-काय केलं होतं, त्या आठवणीपैकी एक अशी आठवण जी विसरणं शक्यच नाही..या आठवणींना उजाळा मिळाला तो रतन खत्री नावाच्या एका कुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनाच्या बातमीमुळं... आता हा खत्री कशासाठी प्रसिद्ध होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही... खत्रीनं जग सोडलं.. पण त्यापूर्वी म्हणजे सुमारे १८ ते २० वर्षांपूर्वी १५ दिवस तोही आमच्या आयुष्यात येऊन गेला.. त्याने आमच्याकडून आकडेमोड करुन घेतली. त्याचं गणित आम्हाला काही रुचलं नाही किंवा जमलं नाही असंही म्हणता येईल.. पण त्यामुळं सांख्यिकीतज्ज्ञ होता-होता थोडक्यात वाचलो. साधारणतः २०००- २००१ सालची ही गोष्ट आहे.. आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आम्ही काही मित्रांनी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता (वडिलांचं स्वप्न होतं. पोरगं घरात वाद घालताना वकिली पाँईंटने वाद घालतो..त्याला वकिली व्यवसाया...

कोरोना संपणार..पण पिळवणूक अटळ..

इमेज
येणाऱ्या काही दिवसांत कोरोना (CoronaVirus) विषाणू निघूनही जाईल. पण त्यानंतर ज्या अडचणी सुरु होणार आहेत, त्या कल्पनेपलिकडच्या असू शकतील. सध्या यात हातावर पोट असणारे भरडले जात आहेत. त्यानंतर वेळ येईल खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची. मार्च-एप्रिल महिना उजाडताच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागलेले असतात. म्हणजे अप्रायझलसाठी या काळाची सर्वचजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. बहुतांश ठिकाणी सालाबादप्रमाणे यासाठीचे सर्व सोपस्कार सुरु होते. पण मध्येच या कोरोना विषाणूरुपी किड्याने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम व्यवस्थित केले आहे. दरवर्षी 'कॉस्ट कटिंग'चे कारणे देऊन किरकोळ पगारवाढ केली जात. यंदा पगारवाढ लांबच पगार कपातीची भाषा आत्ताच बोलली जात आहे. किंबहुना नोकरीच धोक्यात आली असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईएमआय, जबाबदाऱ्या या इतर आर्थिक गोष्टींमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे कोणाच्याच हाती काही नाही, अशी परिस्थिती सध्यातरी आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे खऱ्या अर्थाने पिळवणुकीचे दिवस आता सुरु होणार आहेत किंबहुना...

सब मोह.. माया.. और ममता..

इमेज
राष्ट्रीय राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. देशाच्या राजकारणात काँग्रेस-भाजपा हे जरी प्रमुख पक्ष असले तरी माया-ममता-जयललिता यांचा मोठा दबदबा होता आणि आहे. यातील जयललिता यांचं निधन झालं, त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात थोडीशी पोकळी निर्माण झाली आहे. पण मायावती आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या अजूनही त्यांच्या विरोधकांना स्वस्थ बसू देत नाहीत. तिकडं दिल्लीत असं सुरू असताना.. इकडं आमच्या गल्लीतल्या व्हॉट्सअप ग्रूपवरही यावरुन प्रचंड वाद होताना दिसतात.. एकवेळ काही गोष्टींसाठी भाजपा-काँग्रेस किंवा तमाम विरोधी पक्ष एकत्र येतील.. परंतु, व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर केलेल्या टिप्पणीमुळे मित्रा-मित्रांमध्ये तणावाचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. असो.. सांगण्याचा मुद्दा हा आहे की या राजकारणाने मैत्रीत वितुष्ठ निर्माण होत आहे.. दर आठवड्याला पुणे-सोलापूर-पुणे माझी वारी असते. बहुतांशवेळा हा प्रवास रेल्वेने होतो.. क्वचितप्रसंगी एसटीनेही मी जातो. मध्यंतरी मी नेहमीप्रमाणे पुण्याहून हुतात्मा एक्स्प्रेसने सोलापूरला येत होतो. माझ्या आरक्षित आसनाशेज...

आगाशे गुरूजी...

इमेज
मोहन आगाशे (Actor Mohan Agashe) अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते... माझा यांच्या बाबतीत एक योगायोग आहे... आतापर्यंत यांना तीन वेळा खूप जवळून पाहिलं..पण तिन्ही वेळेस ते एखाद्या बँके जवळ दिसले.. मग ती ब्लड बँक असो की आपली नेहमीची... पहिल्यांदा सुमारे 7 ते 8 वर्षांपूर्वी सोलापुरातील दमाणी ब्लड बँकेजवळ (Damani Blood Bank, Solapur) ते दिसले होते.. आयएमए मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते.. एकट्यानेच रस्त्यावरून जात होते... दुसऱ्यांदा म्हणजे 3 ते 4 महिन्यापूर्वी पुण्यातील शिवाजी नगरला म्हणजे आमच्या ऑफिसच्या खाली बँक ऑफ इंडिया म ध्ये ते आले होते.. बँकेतून बाहेर आल्यानंतर आपल्या ड्रायव्हर वर जरा चिडले होते... तिसऱ्यांदा म्हणजे आज ते मला डेक्कन येथील एसबीआय ब्रँच जवळ दिसले..यावेळी ते आपल्या तरुण सहकऱ्यासोबत गप्पा मारत येताना जवळून गेले... आता पाहू भविष्यात कुठं भेटतील 😊 - दिग्विजय जिरगे divijay,jirage@gmail.com Digvijay Jirage

जिद्दी आणि सपने..

इमेज
मुव्हीज ओकेवर सनी देओलचा जिद्दी चित्रपट लागलाय..कॉलेजला असताना आम्ही मित्रमंडळी भरपूर चित्रपट पाहायचो.. एकदा आम्ही दोन-तीन मित्र कामानिमित्त (म्हणजे काम एकाचं आणि आमची त्याच्यामागे सायकलवर वरात) बाहेर पडलो होतो.  सोलापुरात भागवत थिएटर आहे.. जिथे एकाच ठिकाणी ५ ते ६ टॉकिज आहेत. म्हणजे मल्टिफ्लेक्स ही संकल्पना येण्यापूर्वी किमान ५० ते ६० वर्षांपूर्वी सुरू झालेले हे थिएटर्स.. तर आमचं काम १२ पर्यंत उरकलं आणि सनीचे त्याकाळी आम्ही सगळेच फॅन असल्यामुळे जिद्दी चित्रपट पाहिला.. आणि लगेच त्यानंतरचा साडेतीनचा सपने हा दुसरा चित्रपट सलग पाहिला..म्हणजे १२.३० ते ३.३० आणि ३.३० ते ६.३० असे दोन शो पाहिले.. पहिल्यांदाच सलग दोन चित्रपट पाहण्याचा योग आला. त्यानंतर असे प्रयोग आम्ही अनेकवेळा केले.. मॉनिंग आणि मॅटिनी एकत्र पाहणे वगैरे..धम्माल यायची असलं काही करताना.. - दिग्विजय जिरगे 

बालाजी वेफर्स, भाजी मंडई आणि लादेन

इमेज
CODE NAME GERONIMO हा हॉलिवूडचा लादेनवरील चित्रपट उत्सुकतेपोटी पाहिला. पण चित्रपटाने घोर निराशा केली. हॉलिवूड पट खूप शिस्तीत आणि तयारीने केलेले असतात असं ऐकलंय.. पण या चित्रपटात असं काही झालं नसल्यासारखं दिसतं.. अमेरिकेबाहेरचं शुटिंग बहुधा सेकंड डायरक्टेरनं केलं असावं किंवा शुटिंग करताना ज्या गोष्टी टाळायला हव्यात त्याकडं दुर्लक्ष केलं असावं. चित्रपटाच्या सुरूवातीला काही चांगलं पाहायला मिळेल असं वाटलं होतं.. पण.. काही प्रसंग हे हिंदी चित्रपटातील कथानकाप्रमाणे आहेत.. पण चित्र पटातील सर्वांत दुबळी आणि वाईट गोष्ट म्हणजे चित्रपटासाठी पाकिस्तानमधील पेशावर, अबोटाबाद येथील जे प्रसंग दाखवले आहेत.. ते सर्व महाराष्ट्रातील आहेत.. ते असण्याबद्दल आक्षेपही नाही.. पण हॉलिवूडकरांनी एवढा मोठा चित्रपट बनवताना थोडीही काळजी घेतली नाही याचेच आश्चर्य वाटते. पाकिस्तानी कलाकारच्या भूमिकेत मराठी अभिनेते राजेश शृंगारपुरे, दुसरा एक ओळखीचा चेहरा आहे. शिवाय हर्ष छायांसारखा एक अनुभवी कलाकारही आहे. पण त्यांची भूमिका अवघ्या काही सेकंदाचीच आहे. पाकिस्तानातील जो पहिला प्रसंग दाखवलाय तिथंच हास्यास्पद अनुभव आल...

सामान्य भाजीविक्रेती ठरली शेतकऱ्यांसाठी आदर्श; ३ गुंठ्यात ५२ पिके घेण्याची साधली किमया

इमेज
अपुरा पाऊस, नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात आणि देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारकडून कर्जमाफी, पीक विमा आदी योजनांद्वारे बळीराजाला या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दुसरीकडे मात्र आत्महत्या काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कर्ते पुरूष कंटाळून आत्महत्येचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. पण इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर ही रडगाणी न गाता..अवघ्या काही गुंठ्यात..आदर्श आणि यशस्वी शेती कशी करता येते याचा वस्तूपाठच एका माऊलीने उभा केला आहे. मनीषाताई भांगे असे या माऊलीचे नाव असून त्यांनी खैरेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेती कशी करावी याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. अशिक्षीत असूनही एखाद्या कृषी तज्ज्ञाला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता अशा परिस्थितीलाही न डगमगता यशस्वी शेती करत त्यांनी शेतीपूरक उद्योगही उभा केला. अवघ्या ३ गुंठा शेतीत ५२ पिके घेण्याची किमया त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता त्यांनी सेंद्रिय शेती करून प...