पोस्ट्स

आणेवारी

इमेज
नुकताच एका निवृत्त नायब तहसिलदारांशी भेट झाली. नायब तहसिलदार होण्यापूर्वी त्यांनी काही वर्ष सर्कल ऑफिसर म्हणून काम ही केले होते. आणेवारी कसं काढतात याविषयी त्यांना विचारलं असता अत्यंत भाबडेपणाने त्यांनी आपल्याला त्याचं गणित अजूनही कळालं नसल्याचं सांगितले. इतकी वर्ष काम केलं पण मला ते जमलं नसल्याचं त्यांनी कबूल केलं. तसंच आणेवारी काढताना ती ४५ ते ५५ च्या दरम्यान येईल अशा पद्धतीने संबंधित कर्मचारी काढतो, आणि जो ही आणेवारी काढतो त्यालाही हे समजलेल नसतं हे मात्र त्यांनी आत्मविश्वासाने म्हटलं. हे सर्व सांगणं यासाठी की सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. पण माळशिरस आणि उत्तर सोलापूर या दोन तालुक्यातील आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्यामुळे तिथे दुष्काळ जाहीर होऊ शकलेला नाही. या महाशयांशी बोलल्यानंतर जाणवंल की या भागातील शेतकरी दुष्काळग्रस्तांच्या यादीत का येऊ शकले नाहीत.

भागम भाग

इमेज
१६० किलो वजन (माझ्या स्वत:चे ८५+ पाठीवर ३० ते ४० किलो+ हातात ४० किलो= १६०, वजनात कमी अधिक होऊ शकतं) घेऊन तेही रेल्वेच्या ट्रॅकवरून पळणे किती कठीण असते याचा प्रत्यय मला शनिवारी आला.  चिंचवडवरून लोकलने पुण्याला येण्यासाठी एरवी अर्धा तास लागतो. परंतु शनिवारी जेव्हा मी ४.४५च्या लोकलने पुण्याकडे निघालो तेव्हा तब्बल सव्वा तास वेळ लागला. विशेष म्हणजे मी ज्या रेल्वेने पुढे जाणार होतो ती सहा वाजता निघणार होती. या लोकलने मनाचा मोठेपणा दाखवत दुसऱ्या रेल्वेंना मार्ग देण्यासाठी प्रत्येक ठ िकाणी १० ते १५ मिनिटांचा थांबा घेतला. याचा फटका माझ्यासारख्या अनेक "पापभिरू' प्रवाशांना बसला. ५.४५ला लोकल शिवाजीनगरला आली तेव्हा मला जरा हायसं वाटलं. कारण तिथून अवघ्या ५ मिनिटांत पुणे स्टेशन येते याची खात्री मला होती. परंतु तो दिवसच खराब होता असं म्हणता येईल. पुणे स्टेशन नजरेच्या टप्प्यात (सुमारे अर्धा किमी) होतं. पण लोकलने नेमका इथच घात केला. बया तिथंच थांबली. पुन्हा एका सिग्नलसाठी. त्या संपूर्ण लोकलमध्ये माझ्यासारख्या अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. हे जेव्हा मी लोकलमधून खाली उडी मारली तेव्हा मला ...

'ते' दिवस

इमेज
मागचा पंधरवडा खूप भयावह गेला. दवाखाना कशाशी खातात माहीत नसलेला मी थेट आयसीयूचा अनुभव घेऊन आलो. (तसा अधूनमधून मी डॉक्‍टरांकडे जायचो पण आजारापेक्षा चेहऱयावरचे डाग, पोट साफ होत नाही किंवा जरा जास्‍तच साफ होतंय.. या पलीकडे कधी प्रसंगच आला नाही.) परवा अशाच काही कारणासाठी डॉक्‍टरांकडे गेलो होतो. तेव्‍हा त्‍यांनी त्‍यांच्‍या लॅपटॉपवर माझी शेवटची नोंद दोन वर्षांपूर्वीची दाखवली (सध्‍या डॉक्‍टरांकडे ही एक चांगली सोय असते). शिवाय इतक्‍यात कोणाला पाहण्‍यासाठी हॉस्‍पीटलची चक्‍कर ही झाली नव्‍हती. मग हे झालंच कसं ? तसा मी दिसायला तर एकदम धष्‍टपुष्‍ट. वजन चांगल 85 किलो (चूकभूल देणेघेणे). खाण्‍याच्‍या बाबतीतही एकदम चोंखदळ. (शेलका माल जरा जास्‍त लागतो). पण सातत्‍याचा अभाव. म्‍हणजे कसं वेळेवर काही खाणं नाही. आणि पत्रकारितेत असल्‍यामुळे झोपेचे त्रांगडं. भविष्‍यात ते कधी जमेल असं वाटतही नाही. तर मग झालं असं आदल्‍यादिवशी रात्री पानं लावून (पान लावणे हे वृत्‍तपत्रात काम करणाऱयांना वेगळं सांगण्‍याची गरज नाही) घरी जाण्‍यास थोडा उशीरच झाला. खरं म्‍हटलं तर कामानंतरच्‍या गप्‍पांमुळे हा उशीर झाला. म्‍हणजे र...

सत्‍तेची ऊब आणि बदलीचे राजकारण..

इमेज
अखेर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्‍त चंद्रकांत गुडेवार यांची बदल झालीच. राजकारणात वैयक्तिक महत्‍वकांक्षेसमोर कुणाचे काही चालत नसते हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले. जे कालपर्यंत गुडेवार यांचे समर्थक होते. त्‍यांनीच गुडेवारांच्‍या बदलीचा प्रश्‍न प्रतिष्‍ठेचा केला होता. सत्‍तेची उब मिळाली की माणूस कसा बदलतो याचे हे मुर्तिमंत उदाहारण. यापूर्वी जे कॉंग्रेसला जमले नाही ते भाजपने करून दाखवले. निमित्‍त काय तर मुदत संपलेल्‍या महापालिकेच्‍या गाऴयांचा लिलाव. हे गाळेधारकच पालिकेचे उत्‍पन्‍न बुडवत होते. अशा वेळेस सत्‍ताधाऱयांनी आयुक्‍तांना साथ देणे अपेक्षित असताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मात्र वैयक्तिक आकसापोटी ताकद पणाला लावून बदली केली. भविष्‍यात आपल्‍या या ताकदीच्‍या सोलापूरच्‍या विकासासाठी ते किती उपयोग करतील हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून पालिकेतील वातावरण तसं गुडेवार यांच्‍या विरोधातच चालंल होतं. गुडेवार यांच्‍यामुळे ज्‍यांची ज्‍यांची दुकानदारी बंद झाली होती. ती मंडळी एकत्र येत होती. तिथेच त्‍यांच्‍यासाठी धोक्‍याची घंटा वाजली होती. गेल्‍या आठवड़़यातच गुडेव...

आता पुनश्‍च हरिओम ...

खूप दिवस झाला हातून काही लिखाण होत नव्‍हतं. औरंगाबादहून सोलापूरला येऊन 7-8 महिने झाले. पण कामाचं वेळापत्रक अंगवळणी न पडल्‍यामुळे सर्वच गोष्‍टींचे 3/13 वाजले. त्‍यामुळे इच्‍छा असूनही अनेक विषयांवर लिहायचं राहून गेलं. आता लिहायचं ठरवलं, ते प्रत्‍यक्षात अंमलात आणायचं प्रयत्‍नही करेन. पाहुयात... (मध्‍यतंरीच्‍या काळात अनेकांनी याबद़दल टोमणेही मारले.)  

हे वाचल्‍यावर शेक्‍सपिअर म्‍हटला असता नावातच आहे सर्वकाही...

इमेज
नावात काय आहे, असे काही वर्षांपूर्वी शेक्‍सपियरने म्‍हटले होते. पण नावात काहीच नसंत असं खरंच असतं काय ? खरं तर नावांतच सर्व काही असतं. जगातील प्रत्‍येक आई-वडील आपल्‍या मुलाचं नाव काही तरी वेगळं, आकर्षक किंवा त्‍यातून गर्भित अर्थ निघेल असे ठेवत असतात. ही नावे ठेवण्‍यासाठी पालकांनाही मोठी कसरत करावी लागते. पूर्वीच्‍या काळी जगावेगळी नावं ठेवण्‍यासाठी पुस्‍तकं असायची. मग पालक बाजारातील अशी पुस्‍तकं शोधून काढत आणि आपल्‍या चिरंजीवांना किंवा सुपूत्रीला योग्‍य असं नाव (किमान त्‍यांना तरी वाटतं) ठेवत. आता तर एका क्लिकसरशी ही नावे कॉम्‍प्‍युटरच्‍या पडद्यावर अवघ्‍या काही सेकंदात मिळतात. काही मुलं आपल्‍या पालकांनी दिलेली नावे सार्थ ठरवतात तर काही आपल्‍या पाल्‍यांनाच तोंडावर पाडतात. एवढया कष्‍टाने नाव दिल्‍यानंतरही आपल्‍या मुलाला टोपण नाव (निक नेम) ठेवण्‍याचीही प्रथा दिसून येते (जसं एखाद्या विद्यापीठाने मानद डॉक्‍टरेट पदवी द्यावी). ही टोपण नावे कधी घरातून तर कधी मित्रपरिवाराकडून मिळतात. तर कधी-कधी त्‍यांच्‍या कर्तुत्‍वाने (कोणते कर्तुत्‍व हे ज्‍याच्‍या-त्‍याच्‍या कर्माने ठरत असते)...

सचिन नावाचा 'बाप' माणूस!

इमेज
सचिनने निवृत्ती घेतली आणि तमाम क्रिकेट चाहत्‍यांनी हळहळ व्‍यक्‍त केली. प्रत्‍येकाला जसा आश्‍चर्यचा धक्‍का बसला तसा तो मलाही बसला. सचिन निवृत्ती घेणार असल्‍याची चर्चा गेल्‍या काही दिवसांपासून माध्‍यमांमध्‍ये येत होती (तशी ती गेल्‍या अनेक वर्षांपासून होतीच, पण यावेळेसची बाब जरा वेगळीच). तरीसुद्धा त्‍याने निवृत्ती घेतल्‍यानंतर सगळं काही अनपेक्षितरित्‍या घडलं. त्‍यामुळे त्‍याच्‍या निवृत्तीचा निर्णय पचनीच पडत नाहीये. मागील काही दिवसांत सचिनची कामगिरी खालावली होती. ती पाहता सचिनने आता निवृत्ती घेतलीच पाहिजे, असे म्हणणारे जसे अनेक होते. तसेच त्‍याने निवृत्तीचा निर्णय आताच का घेतला, असे म्‍हणणारेही अनेकजण आहेत. सचिनने क्रिकेटच्‍या मैदानात किती विश्वविक्रम केले आणि सामनावीर पुरस्‍कार कितीवेळा मिळवले, हे आता सर्वांनाच माहिती आहे. त्‍यामुळे ते सांगण्‍याचे इथे काहीच प्रयोजन नाही. याची माहिती क्रिकेटरसिकांना वेगवेगळया माध्‍यमातून मिळत आली आहेच. सचिन तेंडुलकर नावाचे गारूड माझ्या पिढीच्या मनावर कधीपासून राज्‍य करायले लागले हे लक्षातच आले नाही. लहानपणी क्रिकेटचा 'क' कळण्‍याप...