पोस्ट्स

प्रवास विकासाकडे की महा (भ्रष्ट) राष्ट्राकडे?

इमेज
महाराष्ट्राने नुकतेच आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले . हे वर्ष साजरे करताना सरकारने राज्याच्या प्रगतीचे मोठे गोडवे गायले . जाहिरातींचा भडिमार केला . महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात कशी प्रगती केली , विकासदर कसा वाढला , याची सचित्र जाहिरातबाजी मोठया प्रमाणात केली . परंतु , वस्तुस्थिती तशी आहे का ? निश्चितच नाही . ज्या प्रगतीचे आपण गोडवे गात आहोत ते सर्व फसवे आहे . आपल्या प्रगतीचा वेग तर मंदावला आहे . पण राज्यातील भ्रष्टाचारानेही टॉप गियर टाकलाय . महाराष्ट्राबरोबरच्या गुजरातने तर प्रगतीत केव्हाच ओव्हरटेक केलायं. ‘बिमारू’ म्हणवणा-या बिहारचाही विकासाचा दर वाढलाय. त्याचवेळी महाराष्ट्राचा प्रवास उलटया दिशेने होतोय. पूर्वी इतर राज्ये आपल्या राज्याची धोरणे ठरवताना महाराष्ट्राचा आदर्श ( घोटाळा नव्हे ) ठेवायचे. सगळया राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली पण ती विकासामध्ये नव्हे तर भ्रष्टाचारामध्ये... एकीकडे देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील अण्णा हजारे प्रयत्न करीत असताना त्यांचाच महाराष्ट्र संपूर्ण देश...

क्रिकेट विश्वकप ........... अण्णा.. ....आइपीएल... विजयी कोण ?

इमेज
परवा एका दुकानात गेलो होतो दुकानामध्ये सतत गर्दी असल्यामुळे येणाऱ्या customer ची करमणूक व्हावी म्हणून तिथे एक टीवी सतत चालू असतो. त्यादिवीशी देखील टीवी चालू होता आणि प्रत्येक news channel वर अन्ना हजारे यांचीच बातमी चालू होती. त्यामुळे सतत वाहिनी बदलून कुठे timepass साठी काय लागले आहे का हे दुकानाचा मालक पाहत होता कारण नुकताच world cup संपल्यामुळे त्यालाही करमत नवते. सगळीकडे अन्ना हजारे पाहून तो थोडा वैथाग्ला आणि त्यानेही भ्रष्टाचाररावर एक कॉमेंट पास केली व आपला भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नाही अश्यप्रकारचे वक्तव्य केले. (आण्णांनी उपोषण हे भ्रष्टाचारात होर्पल्नार्या सर्वसामान्य लोकांसाठी केलेले आहे म्हणजे त्याच्यासारख्या लोकांसाठी केलेले आहे याची त्याला कदाचित कल्पना नसावी) व टीवी बंद केला.त्याचवेळी दुकानात एक २० ते २५ वयाचा मुलगा होता त्यानेही एक टोकाची comment केली व टीवी बंद केला. मला याचे आश्चर्य वाटले, एकीकडे देशात अण्णानला सर्व थरातून पाठींबा मिळतो student , actor , राजकारणी लोकांचे पाठींबा मिळत असताना हि अशी प्रतिक्रिया एकूण मी चाट पडलो. अण्णा तिथे देशातील जनतेसाठी उपोषण करू...