पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट...

इमेज
ज्यांच्या घरी लहान मुलं असतात तिथं हमखास चालणारा हा संवाद. ते छोटं मूल रोजचे शब्द चुकीचं उच्चारत असतं. त्यांना ती, तो, ते (gender of things) याच्यातील फरक समजत नसतो... ते हमखास 'तो' असेल तर 'ती' चा शब्दप्रयोग करतात किंवा 'ती' असेल तर 'तो' असं म्हणतात. मुलांनी असा चुकीचा उच्चार केला की आई-वडील-आजी-आजोबा लगेच त्यांना तो उच्चार कसा चुकीचा आहे, हे सांगतात. आमच्या घरीही असे प्रकार होतात. माझा मुलगा विराज पूर्वी असा घोळ घालायचा आता छोटी शताक्षी असं करते.  हेही वाचा-   अभिनेत्री ते यशस्वी स्टार्टअपचा प्रवास अगदी हेच ल्युमिनियस या इन्व्हर्टर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत दिसून येतं. महिला दिनाच्या निमित्ताने ग्रे ग्रूपने ही जाहिरात तयार केली आहे. जाहिरात बरोबर लाईटशी कनेक्ट केली आहे. ही जाहिरात बेस्टच झाली आहे. प्रत्येकाला आपल्या घरात असे घडलेले किस्से लगेच समोर येतील.  जाहिरातीची ही कल्पना मोठ्या ब्रँडला पटवून विकणे हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर ल्युमिनिअसनेही अशी जाहिरात करुन एक धाडसी पाऊल उचललं आहे. हेही वाचा-  जगातील सर्वात मोठं स्कल्पचर केरळमधील...

अभिनेत्री ते यशस्वी स्टार्टअपचा प्रवास

इमेज
तिरुपती बालाजी मंदिर येथून ही केस (Hair) खरेदी करते आणि स्वतःच्या वेबसाईटवर ते विकून महिन्याला लाखो रुपये कमावते.  पारुल गुलाटी तिचे नाव असून 'निश हेअर'ची ती संस्थापिका आहे. पारुल एक अभिनेत्री, कंटेट क्रिएटर आणि उद्योजिका आहे. नुकताच ती शार्क टँक इंडियामध्ये आली होती. पारुलने काही सिनेमे, वेब सिरिज आणि मालिकांमधून काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर ती भरपूर चर्चेत आहे.  भारतातील लाखो, कोट्यवधी महिला केस गळतीसह केसांच्या इतर समस्येला सामोरे जातात. अनेकजण यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. फॅशन आणि ब्यूटी इंडस्ट्रीच्या पलीकडचा विचार पारुलने केला. देशात चांगल्या दर्जाच्या मानवी केसांच्या व्यवसायाची वाट तिने धरली. त्यातूनच तिने २०१७ मध्ये भारतातील पहिले ऑनलाइन हेअर एक्स्टेंशन सुरु केले. पहिले दोन वर्षे तिने विविध ठिकाणी स्टॉल्स लावून डेमो दाखवले, लोकांना हेअर एक्स्टेंशनबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिलाही कोविडचा फटका बसला. कोरोना महामारीमुळे फिजिकली डेमो दाखवणे बंद झाले.  तेव्हाच तिने पर्सनल ब्रँडिंगच्या पॉवरचा फायदा घेतला. मग तिने इन्स्टाग्रामवर रिल्स पोस्ट करण...

पुन्हा 'कॅम्पा कोला' म्हणजेच 'The Great Indian Taste'

इमेज
थम्स अप, कोका कोला, पेप्सी आणि इतर कोल्ड ड्रिंकला टक्कर देण्यासाठी अंबानींनी म्हणजेच रिलायन्सने (Reliance) 'कॅम्पा कोला' (Campa Cola) रिलाँच केलं आहे (कॅम्पा ब्रँड हा तसा जुना आहे. रिलायन्सने तो खरेदी केला आहे.). त्यामुळे आता कोल्ड ड्रिंक कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा 'कोल्ड वॉर' सुरु होणार असं दिसतंय. रिलायन्स सध्या ज्या बिझनेसमध्ये उतरतंय (जियो वगैरे) ते पाहता या क्षेत्रातही आता 'कर लो दुनिया मुठ्ठी मैं' असंच होण्याची शक्यता आहे.  रिलायन्ससारखा ब्रँड कॅम्पा कोला घेऊन येतंय म्हटल्यावर आता या मार्केटमधील दिग्गज कंपन्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलली असणार. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत आता आपल्याला क्वॉलिटी, क्वाँटिटी, प्राइस त्याचबरोबर जाहिरात जगतात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कॅम्पा कोलाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण असणार याची उत्सुकता आता आहे आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडरसाठी रिलायन्स पैसा गुंतवायला मागे पुढे पाहणार नाही हे मात्र खरं आहे. जाहिरातीच्या दृष्टीने 'कॅम्पा कोला'वर थोडीशी नजर टाकूयात. कॅम्पा ब्रँड नावाचा फायदा घेण्यासाठी रिलायन्स जाहिरात करताना त्यांच्...