भारतीय संगीतातील वादळ
भारतीय संगीतातील वादळ अल्लारखाँ रहमान अर्थातच ए आर रहमान भारतीय चित्रपटसृष्टीतील दैवी देणगी लाभलेला संगीतकार. संगीतप्रेमी त्याला 'पूर्वेकडचा मोझार्ट' म्हणतात. 'रोजा' चित्रपटापासून सुरू झालेला रहमानचा हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. संगीतरचनेच्या रूढपद्धतीविरूद्ध बंड करणारी कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानावरील हुकूमत लाभलेल्या रहमानचा वैयक्तिक व व्यावसायिक प्रवास अत्यंत नाट्यमय असा आहे. आपल्या जादुई संगीतामुळे सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रहमानबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. परंतु, रहमानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणालाच जास्त माहिती नाही. किंबहुना ती माहिती बाहेर जाऊच नये असाच प्रयत्न केला गेला. 'ए आर रहमान- दी म्युझिकल स्ट्रॉम' या मूळ इंग्रजी व 'ए आर रहमान- संगीतातील वादळ' या मराठी अनुवादित पुस्तकातून एक वाद्य वाजवणारा दिलीप ते ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ए आर रहमान हा प्रवास उलगडण्यात आला आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका कामिनी मथाई या आहेत. तर मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे. रहमान व त्याच्...