देवाचिया द्वारी...लुटुनीया सारे...

देवाचिया द्वारी...लुटुनीया सारे...

शनी शिंगणापूरला चोऱ्या माऱ्याची भिती नसते. त्यामुळं तेथील घरांना दरवाजेही नसतात म्हणे. पण तेथील ग्रामपंचायतीचे कर्मचारीच (कदाचित कंत्राटदाराचे कर्मचारी असतील) भाविकांबरोबर ग्रामपंचायतीलाही लुटत असल्याचे दिसले. शिंगणापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ग्रामपंचायत २ रूपये प्रवेश कर घेते. टोल नाक्याप्रमाणे आत येतानाच वसुली केली जाते. खासगी वाहनात आलेल्या व्यक्तींची शिरगणती करून समोरील व्यक्ती त्याप्रमाणे पैशांची मागणी करतो (मोजून अर्ध्या मिनिटांत ही प्रोसेस होते). जुजबी रक्कम असल्यामुळं कोणी त्या पावतीकडं पाहत ही नाही, असं वाटतं. शनिवारी आमच्याकडून कर घेणाऱ्या व्यक्तीने १० रूपये मागितले आणि पावती चालकाच्या हातात न देता त्याने ती स्पीडोमीटरवर टाकली. वाहन चालकाने हातात घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता, त्या 'करवसुली अधिकाऱ्याने' लगेच पुढे चला मागे वाहनं थांबलीत म्हणून पुढे दामटले. 


कदाचित रक्कम कमी असते म्हणून कोणी पाहत नसावे. पण उत्सुकतेपोटी पावती हातात घेऊन पाहिली असता. ती फक्त ४ रूपयांचीच निघाली. म्हणजे त्याने ५ व्यक्तींऐवजी २ व्यक्तींच्या कराचीच पावती दिली आणि पैसे घेतले ५ व्यक्तींचे म्हणजे १० रूपये. याचाच अर्थ त्याने ६ रूपये आपल्या खिशात घातले (दिवसभरात त्याने किती कमावले असतील ?). आमच्या वाहनाने बरेच अंतर गाठले असल्याने परत फिरता आले नाही. त्यात पुन्हा मंदिर परिसरात आल्यानंतर काही व्यक्तींचा उपद्रव वेगळाच असतो. वाहन पार्किंग त्यांनी सांगेल त्या ठिकाणी करण्यासाठी दमदाटी करणे प्रकार सर्रास घडतात. काहींना याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न फोल ठरले.#shanishingnapur #shani #shingnapurgrampanchyat#corruption

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'