पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मग्रूर सावकार आणि बनाना चिप्स...Beyond Snack

इमेज
सोनं दाताखाली चावून त्याची शुद्धता किंवा अस्सलपणा ओळखण्याची जुनी पद्धत केळीच्या चिप्ससाठी (ज्याचा रंग सोन्याप्रमाणे पिवळा असतो) वापरण्याची जबरदस्त कल्पना या जाहिरातीत वापरण्यात आली आहे. ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा' या जाहिरातीसाठीचे कलाकार आणि सेटअपही भारी आहेत. गावातील मग्रूर सावकार लोकांकडून सोनं घेऊन पैसे देत असतो. यासाठी त्यानं एक छोटसं मशीन आपल्या जवळ ठेवलं आहे. सोनं चावून त्याप्रमाणे तो लोकांना त्या मशीनमधून पैसे देतोय. त्याचवेळी एकजण खोटं सोनं देतो. ते सोनं सावकारानं दाताखाली घेताच त्याचे तुकडे होतात. सावकाराची लोकं लगेच त्या माणसाला उचलून नेतात. यावेळी वापरलेलं बॅकग्राऊंड म्युझिक प्रसंगाला अनुरुप आहे. बियाँड स्नॅक्सचे केळीचे चिप्सही सोन्यासारखे अस्सल असल्याचे अत्यंत स्मार्ट पद्धतीनं या जाहिरातीत दाखवलं आहे. प्रेझंटेशन चांगलं झालं आहे. बालाजी वेफर्स, भाजी मंडई आणि लादेन जाहिरात एजन्सी- Sterling AG - डॉ. दिग्विजय जिरगे #जाहिरात #advertisement #creative

भावनेला अलगद स्पर्श करणारी जाहिरात - Brooke Bond Red Label

इमेज
काही प्रॉडक्टच्या जाहिराती नेहमी मनाला स्पर्श करणाऱ्या असतात. ब्रुक बाँड रेड लेबल (Brooke Bond Red Label) हे उत्पादन त्यापैकी एक. सध्याची त्यांची नवी जाहिरात ही भावनेला हात घालणारी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे यात काम केलेल्या सुलभा आर्य यांच्या अभिनयामुळे ही जाहिरात एका वेगळ्याच उंचीवर जाते. (Creative and Emotional Advertisement of Brooke Bond Red Label) तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट... सुलभा आर्य यांचा निरागस अभिनय (Sulbha Arya's Best Acting) घरासमोर असलेल्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनोळखी लोकांना म्हणजे रुग्णासोबत आलेल्यांना सुलभा आर्य या चहा देताना यात दाखवण्यात आले आहे. तणावात असलेल्या लोकांना घोटभर चहा देऊन त्याचबरोबर त्याची आपलेपणाने चौकशी करुन त्यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न त्या करत असतात. सुरुवातीला चहा नको म्हणणारी व्यक्ती नंतर चहाचा सुवास येताच मागून चहा पितो आणि गप्पांच्या ओघात तो आपला तणाव काही वेळासाठी विसरुन जातो, असं यात दाखवण्यात आलं आहे.  सुलभा आर्य यांच्या निरागस अभिनयामुळे ही जाहिरात वेगळ्या उंचीवर जाते. त्या गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहेत....