तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य…
प्रशासनातलं नेहमी चर्चेत असणारं नाव...तुकाराम मुंढे...कडक शिस्तीचे आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी असलेले मुंढेसाहेब...त्यांची धडाकेबाज कामगिरी सुरु झाली असे वाटत असते अन् लगेच त्यांची बदली केली जाते... मग सरकार कोणाचेही असो... वाद आणि बदली अटळ... साधारणतः दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना असाच वाद झाला होता...राज्यातील सर्व माध्यमांत ते चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते... आताही अगदी तसंच आहे...त्यावेळी त्यांच्या झालेल्या बदलीवर लेख लिहिला होता...आज नागपूर महापालिकेची जबाबदारी घेऊन उणीपुरी काही महिने झाली होती...आणि वाद तर सुरुवातीपासूनच सुरु झाले होते..तोच त्यांची पुन्हा बदली झाली आहे...त्यामुळे नवी मुंबईतून बदली झालेल्या वेळचा लेख पुन्हा एकदा वाचकांसाठी... आताही तेच सुरु आहे.. फक्त शहर बदललंय..राजकारणी व्यक्ती बदललीत..पण मुंढे साहेबांचं 'टू बी कंटिन्यूय' सुरुच आहे.. - दिग्विजय जिरगे रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥ तम म्हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य । क...