हा खेळ आकड्यांचा...
काही गोष्टी आयुष्यात काही क्षणांसाठी येऊन जातात. पण त्याच्या आठवणी मात्र कायम आपल्याबरोबर राहतात. लेखाची सुरुवात जरी अशी असली तरी पुढचा सगळा भाग अनैतिक गोष्टींचा आहे. अनैतिक (सरधोपट अर्थ घेऊ नका) म्हणजे महाविद्यालयीन जीवनात असताना आम्ही मित्रमंडळींनी काय-काय केलं होतं, त्या आठवणीपैकी एक अशी आठवण जी विसरणं शक्यच नाही..या आठवणींना उजाळा मिळाला तो रतन खत्री नावाच्या एका कुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनाच्या बातमीमुळं... आता हा खत्री कशासाठी प्रसिद्ध होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही... खत्रीनं जग सोडलं.. पण त्यापूर्वी म्हणजे सुमारे १८ ते २० वर्षांपूर्वी १५ दिवस तोही आमच्या आयुष्यात येऊन गेला.. त्याने आमच्याकडून आकडेमोड करुन घेतली. त्याचं गणित आम्हाला काही रुचलं नाही किंवा जमलं नाही असंही म्हणता येईल.. पण त्यामुळं सांख्यिकीतज्ज्ञ होता-होता थोडक्यात वाचलो. साधारणतः २०००- २००१ सालची ही गोष्ट आहे.. आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आम्ही काही मित्रांनी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता (वडिलांचं स्वप्न होतं. पोरगं घरात वाद घालताना वकिली पाँईंटने वाद घालतो..त्याला वकिली व्यवसाया...