कोरोना संपणार..पण पिळवणूक अटळ..
येणाऱ्या काही दिवसांत कोरोना (CoronaVirus) विषाणू निघूनही जाईल. पण त्यानंतर ज्या अडचणी सुरु होणार आहेत, त्या कल्पनेपलिकडच्या असू शकतील. सध्या यात हातावर पोट असणारे भरडले जात आहेत. त्यानंतर वेळ येईल खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची. मार्च-एप्रिल महिना उजाडताच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागलेले असतात. म्हणजे अप्रायझलसाठी या काळाची सर्वचजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. बहुतांश ठिकाणी सालाबादप्रमाणे यासाठीचे सर्व सोपस्कार सुरु होते. पण मध्येच या कोरोना विषाणूरुपी किड्याने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम व्यवस्थित केले आहे. दरवर्षी 'कॉस्ट कटिंग'चे कारणे देऊन किरकोळ पगारवाढ केली जात. यंदा पगारवाढ लांबच पगार कपातीची भाषा आत्ताच बोलली जात आहे. किंबहुना नोकरीच धोक्यात आली असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईएमआय, जबाबदाऱ्या या इतर आर्थिक गोष्टींमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे कोणाच्याच हाती काही नाही, अशी परिस्थिती सध्यातरी आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे खऱ्या अर्थाने पिळवणुकीचे दिवस आता सुरु होणार आहेत किंबहुना...